नाशिक : सार्वजनिक ठिकाणी तसेच शाळा परिसरात सिगारेट फुंकणारे, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारे तसेच विक्री करणाऱ्या ठिकाणांवर पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल यांच्या आदेशान्वये शुक्रवारी (दि़४) संपूर्ण शहरात स्पेशल ड्राईव्ह राबविण्यात आला़ ‘सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंधक कायदा अधिनियम २००३’ अर्थात कोटपा या कायद्यान्वये करण्यात आलेल्या कारवाईत २९३ विक्रेत्यांकडून ५८ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला़पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार शहर पोलीस आयुक्तालयातील तेराही पोलीस ठाणे हद्दीतील शाळा, महाविद्यालयांचा परिसर, चहाची ठिकाणे, बसस्थानके, उपहारगृह या ठिकाणी पोलिसांनी तपासणी केली़ यावेळी सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाºया तसेच अल्पवयीन मुलांना सिगारेट, तंबाखू, गुटखा विक्री करणाºया २९३ विक्रेत्यांवर पोलिसांनी कारवाई केली़ सकाळ व सायंकाळ अशा दोन सत्रात करण्यात आलेल्या कारवाईत ५८ हजार ६०० रुपयांचा दंडकरण्यात आला़अल्पवयीन मुलांच्या धुम्रपानास प्रेरक असे तंबाखूजन्य घटक जसे सिगारेट, गुटखा, तंबाखू यांची विक्री तसेच जाहिरात करणाºयांविरोधात कोटपा - सिगारेट्स आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने (जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य,उत्पादन, पुरवठा व वितरण यांचा कायदा) अधिनियम २००३ अन्वये कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले़व्यसनापासून रोखण्यासाठी कारवाई आवश्यक सार्वजिनक ठिकाणे तसेच शाळा- महाविद्यालय परिसरांत सिगारेट किंव तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीस कायद्याने बंदी असून, त्यासाठीच कोटपा कायदा तयार करण्यात आला आहे़ युवा पिढीला व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी अशा प्रकारची मोहीम आवश्यक असून ती सतत राबविली आहे़- रविंद्र सिगल, पोलीस आयुक्त, नाशिक़
‘कोटपा’ कायद्यातंर्गत पोलिसांचा शहरात ‘स्पेशल ड्राईव्ह’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2018 10:45 PM
नाशिक : सार्वजनिक ठिकाणी तसेच शाळा परिसरात सिगारेट फुंकणारे, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारे तसेच विक्री करणाऱ्या ठिकाणांवर पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल यांच्या आदेशान्वये शुक्रवारी (दि़४) संपूर्ण शहरात स्पेशल ड्राईव्ह राबविण्यात आला़ ‘सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंधक कायदा अधिनियम २००३’ अर्थात कोटपा या कायद्यान्वये करण्यात आलेल्या कारवाईत २९३ विक्रेत्यांकडून ५८ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला़
ठळक मुद्देसंपूर्ण शहरात कारवाई ; २९३ विक्रेत्यांना ६० हजारांचा दंड