शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
3
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
4
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
5
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
6
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
7
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
9
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
10
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
11
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
12
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
13
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
14
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
15
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
16
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
17
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
18
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
19
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
20
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी

खुनातील संशयितांची परिसरातून धिंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2018 9:52 PM

नाशिक : संत कबीरनगरमध्ये जागेच्या वादातून बळजबरीने घरात घुसून एकाचा मारहाण करून खून केल्यानंतर फरार झालेल्या चौघा संशयितांना गंगापूर पोलिसांनी औरंगाबादमधून अटक केली़ या चारही संशयितांची परिसरातील दहशत कमी करण्यासाठी पोलिसांनी सोमवारी (दि़९) संत कबीरनगर, गौतमनगर या परिसरातून धिंड काढली़ या चौघांविरोधात तक्रारी असल्यास नागरिकांनी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे़

ठळक मुद्दे खून केल्यानंतर फरार ; औरंगाबादमधून अटक

नाशिक : संत कबीरनगरमध्ये जागेच्या वादातून बळजबरीने घरात घुसून एकाचा मारहाण करून खून केल्यानंतर फरार झालेल्या चौघा संशयितांना गंगापूर पोलिसांनी औरंगाबादमधून अटक केली़ या चारही संशयितांची परिसरातील दहशत कमी करण्यासाठी पोलिसांनी सोमवारी (दि़९) संत कबीरनगर, गौतमनगर या परिसरातून धिंड काढली़ या चौघांविरोधात तक्रारी असल्यास नागरिकांनी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे़

जागेच्या कारणावरून कुरापत काढून संशयित संजय लक्ष्मण खरात, कल्पेश संजय खरात (दोघेही रा़ कबीरनगर), सुंदर लक्ष्मण खरात, प्रशांत सुंदर खरात (रा़ गौतमनगर, गरवारे कंपनीसमोर, अंबड) यांनी १५ जून रोजी रात्रीच्या सुमारास संत कबीरनगरमधील रहिवासी राजू शेषराव वाघमारे यास जबर मारहाण केली़ या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या वाघमारे यांचा १७ जून रोजी उपचारादरम्यन मृत्यू झाला़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला़ या घटनेनंतर फरार झालेल्या संशयितांना औरंगाबादमधून अटक करण्यात आली़

न्यायालयाने या चौघाही संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे़ नागरिकांच्या मनातील संशयितांबाबत असलेली भीती दूर व्हावी यासाठी पोलिसांनी सोमवारी परिसरातून धिंड काढली़ यावेळी गंगापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांच्यासह गंगापूर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकCrimeगुन्हाPoliceपोलिस