नाशिक : जिल्हा परिषद अंतर्गत गट क संवर्गातील ६८७ जागांसाठी पदभरती करण्यात येणार असून, यामध्ये अनुसूचित क्षेत्राबाहेरील ५८४ जागा तर अनुसूचित क्षेत्रातील १०३ जागांसाठी पदभरती करण्यात येणार आहे. सदरची सर्व प्रक्रि या ही राज्यस्तरावरून एकाच वेळी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिली.राज्यात एकाचवेळी होणाऱ्या या भरतीप्रक्रि येसाठी महाराष्ट्र शासनाच्या ६६६.ेंँंस्रं१्र‘२ँं.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळावर आॅनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. नाशिक जिल्हा परिषदेत अनुसूचित क्षेत्राबाहेरील कनिष्ठ अभियंता (बांधकाम)- १४ , कनिष्ठ अभियंता (ग्रापापु)- ६ , विस्तार अधिकारी (ग्रापं)- ४, कंत्राटी ग्रामसेवक- ६४, आरोग्य पर्यवेक्षक- ४, औषध निर्माण अधिकारी- ११, प्रयोगशाळा तंत्रज्ञ- १३ , आरोग्य सेवक (पुरु ष, हंगामी क्षेत्र कर्मचारीमधून)- ८१, आरोग्य सेवक (पुरु ष)- ६६, आरोग्य सेविका- २८२ , विस्तार अधिकारी (कृषी)- २, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक (बांधकाम)- २०, पशुधन पर्यवेक्षक- ८, पर्यवेक्षिका (अंगणवाडी)- ७, वरिष्ठ सहायक लिपिक- १, कनिष्ठ यांत्रिकी- १ अशा एकूण ५८४ जागा भरावयाच्या आहेत.अनुसूचित क्षेत्रामध्ये कंत्राटी ग्रामसेवक- ११, आरोग्य सेवक (पुरु ष, हंगामी क्षेत्र कर्मचारीमधून)- ९, आरोग्य सेवक (पुरु ष)- ७, आरोग्य सेविका- ७४, पशुधन पर्यवेक्षक- २ अशा १०३ जागा भरावयाच्या आहेत.अनुसूचित क्षेत्रातील निर्देशित संवर्गनिहाय पदे ही शासन अधिसूचनेनुसार नाशिक जिल्ह्यातील स्थानिक अनुसूचित जमातीतील उमेदवारांसाठी राखीव असून त्यासाठी नाशिक जिल्ह्यातील केवळ अनुसूचित जमातीतील स्थानिक उमेदवारांनाच अर्ज करता येणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी यांनी दिली.
नाशिक जिल्हा परिषदेत ६८७ पदांची भरती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2019 6:44 PM
नाशिक : जिल्हा परिषद अंतर्गत गट क संवर्गातील ६८७ जागांसाठी पदभरती करण्यात येणार असून, यामध्ये अनुसूचित क्षेत्राबाहेरील ५८४ जागा ...
ठळक मुद्देनोकरीची संधी: आरोग्य विभागात सर्वाधिक पदे