नाशिक : घरामधील वीजमीटर आता बाहेर बसविण्यात आल्याने आपल्या मीटरचे रिडिंग केव्हा होते आणि किती रिडिंग घेतले गेले याची माहिती ग्राहकाला होत नाही किंबहुना वीज बिल आल्यानंतर अनेक शंका निर्माण होत असल्याने आता ग्राहकांना एक दिवस अगोदरच मीटर रिडिंगची पूर्वसूचना मिळणार आहे.ग्राहकांची गैरसोय होऊ नये, मीटर रिडिंग आणि वीज बिलात अचुकता व पारदर्शकता रहावी यासाठी महावितरणच्या ग्राहकांना आता मीटरचे रिडिंग कोणत्या तारखेला आणि किती वाजता घेण्यात येणार आहे, याची पूर्वसूचना ग्राहकांच्या महावितरणकडील नोंदणीकृत मोबाइलवर एक दिवस अगोदर एसएमएसद्वारे दिली जाणार आहे. महावितरणने आॅगस्ट २०१६ पासून मोबाइल अॅपव्दारे मीटर रिडिंग घेण्याची प्रक्रि या सुरू केली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या वीज बिलात मोठ्या प्रमाणात अचुकताही आली आहे. आता वीजमीटर रिडिंग प्रक्रि येत ग्राहकांना आपले मीटर रिडिंग तत्काळ तपासता यावे म्हणून महावितरणकडे नोंदणी केलेल्या अधिकृत मोबाइलवर ग्राहकांना मीटर रिडिंगच्या पूर्वसूचनेचा एसएमएस देण्यात येणार असून, यात सकाळी ८ ते १०, १० ते १२ दुपारी १२ ते ३ आणि ३ ते ५ या दरम्यान कोणत्या वेळेत रिडिंग घेतले जाणार आहे याची माहिती दिली जाणार आहे. यामुळे ग्राहकांची गैरसोय टळणार असून, रिडिंग घेण्याच्या वेळेस ग्राहकांना उपस्थित राहून योग्य रिडिंग घेतले जात आहे अथवा नाही याची खातरजमा करता येणे शक्य होणार आहे.महावितरणने १ मार्च २०१९ पासून राज्यातील गणेशखिंड, रास्ता पेठ, कल्याण, नागपूर शहर मंडल, वाशी व ठाणे (मुंब्रा व्यतिरिक्त) अशा सहा मंडलात ग्राहकांना मीटर रिडिंगची पूर्वसूचना देण्याची प्रक्रि या प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली आहे.
मीटर रिडिंगची ग्राहकांना मिळणार पूर्वसूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 5:09 PM
नाशिक : घरामधील वीजमीटर आता बाहेर बसविण्यात आल्याने आपल्या मीटरचे रिडिंग केव्हा होते आणि किती रिडिंग घेतले गेले याची ...
ठळक मुद्देपारदर्शकता : एक दिवस अगोदर मिळणार सूचना