नाशिकरोड : मुंबईला जाणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसचे इंजिन कल्याण रेल्वे स्थानकात कपलिंग तुटल्याने डब्यांना सोडून काही अंतर पुढे निघुन गेले. सुदैवाने या घटनेत कुणालाही इजा झाली नाही.नाशिककरांच्या दृष्टीने मुंबईला जाण्या-येण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली पंचवटी एक्स्प्रेस मंगळवारी सकाळी नाशिकरोड रेल्वे स्थानकातून निघाल्यानंतर इगतपुरी, कसारा नंतर ती सकाळी दहाच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानकात पोहचली. कल्याण रेल्वे स्थानकावर निर्धारित वेळ थांबल्यानंतरमुंबईच्या दिशेने पंचवटी एक्स्प्रेस निघाली.मात्र रेल्वे सुरू होतांना हलकासा झटका बसल्याने पंचवटीचे इंजिन व पहिल्या डब्याचे कपलिंग तुटल्याने इंजिन सुमारे चारशे मीटर पुढे गेले. तर इंजिनमागील रेल्वे डबे हे जागीच उभे होते. याबाबत पंचवटीतील प्रवाशांना पुसटशीही कल्पना आली नाही. मात्र कल्याण रेल्वे स्थानकावर उभे असलेल्या प्रवाशांच्या सदर बाब लक्षात येताच झालेल्या आरडाओरडीमुळे पुढे गेलेले पंचवटीचे इंजिन थांबवुन पुन्हा मागे आणुन ते रेल्वे डब्याला व्यवस्थित जोडण्यात आल्यानंतर पंचवटी मुंबईला रवाना झाली.
पंचवटी एक्स्प्रेसचे इंजिन डब्यांना सोडून पळाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 10:52 PM
नाशिकरोड : मुंबईला जाणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसचे इंजिन कल्याण रेल्वे स्थानकात कपलिंग तुटल्याने डब्यांना सोडून काही अंतर पुढे निघुन गेले. सुदैवाने या घटनेत कुणालाही इजा झाली नाही.नाशिककरांच्या दृष्टीने मुंबईला जाण्या-येण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली पंचवटी एक्स्प्रेस मंगळवारी सकाळी नाशिकरोड रेल्वे स्थानकातून निघाल्यानंतर इगतपुरी, कसारा नंतर ती सकाळी दहाच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानकात ...
ठळक मुद्देपंचवटी एक्स्प्रेस : कल्याण रेल्वे स्थानकातील घटनाइंजिन सुमारे चारशे मीटर पुढे गेले.