नाशिक : राज्यात २०१२ पासून शिक्षक भरती बंद करण्यात आली असली तरी विशेष बाब म्हणून शाळांना गणित आणि इंग्रजी विषयांचे शिक्षक भरती करण्याला परवानगी देण्यात आली होती. मात्र या शिक्षकांना अद्यापही मान्यता देण्यात आली नसल्याने जिल्ह्यातील सुमारे ६०० शिक्षकांना वर्षभरापासून विनावेतन काम करावे लागत आहे.शिक्षण विभागाकडून घेण्यात येणारे निर्णय आणि आदेश अल्पावधीत मागे घेण्याच्या किंवा रद्द करण्याच्या प्रकारामुळे शिक्षण विभागातील गोंधळ नेहमीच चर्चेत राहिला आहे. राज्यातील विषयशिक्षकांच्या बाबतही नवा गोंधळ समोर आला असून, शासनाच्या आदेशाने भरती करण्यात आलेल्या शिक्षकांना आता मान्यता तसेच वेतनासाठी संघर्ष करावा लागत आहे. अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना सामावून घेण्याची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत शिक्षकभरतीला बंदी करण्यात आली आहे. २०१२ पासून शिक्षकांची भरतीच बंद असून, या कालावधीत भरती झालेल्या शिक्षकांना शासनाकडून मान्यता दिली जाणार नसल्याचे जाहीर करण्यात आलेले आहे. त्यामुळे अनेक शिक्षण संस्थांपुढे पेच निर्माण झाला असून, असे शिक्षक विनावेतन काम करीत आहेत.दरम्यानच्या काळात इंग्रजी आणि गणित विषयांचे अनेक शिक्षक सेवानिवृत्त झाल्याने या शिक्षकांच्या जागा रिक्त होत्या. या जागांवर इतर विषयशिक्षक शिकवू शकत नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत होते. ही बाब लक्षात घेऊन शासनाने शिक्षकभरतीवरील बंदी कायम ठेवून गणित आणि इंग्रजी विषयांच्या शिक्षकभरतीला विशेष बाब म्हणून मान्यता दिली होती.
गणित, इंग्रजी शिक्षकांच्याही रखडल्या मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 10:19 PM
नाशिक : राज्यात २०१२ पासून शिक्षक भरती बंद करण्यात आली असली तरी विशेष बाब म्हणून शाळांना गणित आणि इंग्रजी विषयांचे शिक्षक भरती करण्याला परवानगी देण्यात आली होती. मात्र या शिक्षकांना अद्यापही मान्यता देण्यात आली नसल्याने जिल्ह्यातील सुमारे ६०० शिक्षकांना वर्षभरापासून विनावेतन काम करावे लागत आहे
ठळक मुद्दे जिल्ह्यातील सुमारे ६०० शिक्षक विनावेतन शिक्षक सेवानिवृत्त झाल्याने या शिक्षकांच्या जागा रिक्त