नाशिक : कारगिल युद्धातील जवानांच्या शौर्य गाथा आणि आणि सुमारे दोन महिने चाललेल्या युद्धात कारगिलची शिखरे ताब्यात घेणाऱ्या भारतीय सैन्यांच्या पराक्रमाची आठवण सैनिकी मुलांच्या वसतिगृहातील कार्यक्रमातून करण्यात आली. यावेळी अपर जिल्हाधिकारी नीलेश सगर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.शासकीय दूध डेअरीसमोरील सैनिकी मुलांच्या वसतिगृहात आयोजित कार्यक्रमप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिारी रामदास खेडकर, सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी के. बी. सातपुते उपस्थित होते. यावेळी सगर म्हणाले, आपल्या जवानांच्या शौर्य, वीरता, पराक्रम आणि बिलदानाचे प्रतीक म्हणून कारगिल युद्धाकडे पाहिले जाते. सुमारे दोन महिने चाललेल्या युद्धात भारतीय सैन्याने कारगिलची शिखरे ताब्यात घेऊन पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांना हाकलून लावले होते. कारगिल युद्धात भारतीय लष्काराला आपले काही वीर जवान गमवावे लागले होते. भारताने २६ जुलै रोजी कारगिलचे युद्ध जिंकल्याने देशभरात हा दिवस कारगील युद्धाचा विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. या युद्धात आपल्या नाशिकचे दोन जवान शहीद झाले असून, या दिनानिमित्ताने शहिद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.खेडकर यांनी प्रास्ताविकात कारगिल विजय दिवसाचे महत्त्व विशद करून शहीद जवानांच्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमास वीरमाता, पिता, वीर पत्नी यांचादेखील सत्कार करण्यात आला.(फोटो आर:२६आरडीसी)कॅप्शन : कारगिल विजयदिन कार्यक्रमात बोलताना अपर जिल्हाधिकारी नीलेश सगर, व्यासपीठावर निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी के. बी. सातपुते उपस्थित होते.
सैनिकी मुलांच्या वसतिगृहात वीर जवानांचे स्मरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 7:15 PM
नाशिक : कारगिल युद्धातील जवानांच्या शौर्य गाथा आणि आणि सुमारे दोन महिने चाललेल्या युद्धात कारगिलची शिखरे ताब्यात घेणाऱ्या भारतीय ...
ठळक मुद्देविजयदिन : कारगिल युद्धाच्या आठवणींचा उजाळा