शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
7
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
8
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
9
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
10
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
11
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
12
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
13
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
14
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
15
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
16
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
17
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
18
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
19
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
20
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल

आरोग्य विद्यापीठ तत्सम विद्याशाखा परिषदेत ७० संशोधन प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 4:36 PM

महाराष्ट्र  आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या तत्सम विद्याशाखेसाठी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय संशोधन परिषदेत विविध विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांनी सुमारे ७० संशोधन प्रकल्प सादर केले. यातून निवड करण्यात आलेल्या संशोधन प्रकल्पांमध्ये सर्वाधिक मुलींचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

ठळक मुद्देसंशोधनात मुली आघाडीवर विविध विद्याशाखांतील सुमारे ७० विद्यार्थ्यांचे प्रकल्प सादरीकरण

नाशिक : महाराष्ट्र  आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या तत्सम विद्याशाखेसाठी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय संशोधन परिषदेत विविध विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांनी सुमारे ७० संशोधन प्रकल्प सादर केले. यातून निवड करण्यात आलेल्या संशोधन प्रकल्पांमध्ये सर्वाधिक मुलींचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने मुंबईतील तेरणा मेडिकल कॉलेज येथे राज्यस्तरीय संशोधन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या राज्यस्तरीय संशोधन परिषदेचे उद्घाटन मुंबईचे आयएसएचएस अश्विनचे बालरोगतज्ज्ञ डॉ. शिला मथाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. टी. देशमुख, महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. कांचनमाला घोरपडे, प्राचार्य डॉ. मेधा देव, विद्यापीठाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रदीप आवळे उपस्थित होते.फिजिओथेरपी, आॅक्युपेशनल थेरपी, नर्सिंग, बॅचलर आॅफ फिजिओथेरपी, बॅचलर इन आॅडिओलॉजी अ‍ॅन्ड स्पिच लॅँग्वेज, पॅथॉलॉजी शाखेतील विद्यार्थी सहभागी झाले होते. या संशोधन परिषदेत विविध विद्याशाखांतील सुमारे ७० विद्यार्थ्यांनी प्रकल्पांचे सादरीकरण केले. यामध्ये परीक्षकांनी सादरीकरणाचे परीक्षण करून स्पर्धकांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक देण्यात आले.पदवी विद्याशाखा गटात मुंबईचे पीडी हिंदुजा कॉलेज आॅफ नर्सिंगची विद्यार्थिनी पी.जया एन्जेल, पुण्याच्या संचेती इन्स्टिट्यूट आॅफ रिहॅबटेशनची झिस्टा पेटल, मुंबईच्या तेरणा कॉलजची श्रृती शहा यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक देण्यात आला. तर मुंबईच्या सेठ जी. एस. मेडिकल कॉलेजचे फिजिओथेरपी सेंटरची निधी सावला हिला उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.पदव्युत्तर पदवी विद्याशाखा गटात मुंबईच्या लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालयाचे फिजिओथेरपी सेंटरची मनीष मिश्र हिने प्रथम, पुण्याच्या तेहमी ग्रॅन्ट इन्स्टिट्यूट आॅफ नर्सिंगची पेरूमब्राईल जिनियम हिने द्वितीय तर मुंबईच्या तेरणा फिजिओ कॉलेजची सुचेता दडास हिने तृतीय क्रमांक मिळविला. सेठ जी.एस. मेडिकल कॉलेजची दर्पणा वराडकर हिने उत्तेजनार्थ बक्षीस मिळविले.शिक्षक व पीएच.डी. विद्यार्थी गटात मुंबईचे के. जे. सोमय्या कॉलेज आॅफ फिजिओथेरपीची इशा ताजणे हिने प्रथम क्रमांक मिळविला. तर पी. डी. हिंदुजा कॉलेज आॅफ नर्सिंगची मृणाल चव्हाण हिला द्वितीय क्रमांक देण्यात आला. नांदेडच्या श्री गुरुदत्त प्रतिष्ठानचे श्रीकांत दराडे यांना तृतीय क्रमांक मिळाला. सेठ जी. एस. कॉलेजची दीप्ती गिते हिला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.परीक्षक म्हणून डॉ. जया कुरुविला, डॉ. क्यारण पावरी, डॉ. वृषाली पन्हाळे, डॉ. जुही दवे, डॉ. मारिया जिंदानी, डॉ. जयमाला शेलये, रिया लखानी यांनी काम केले. सूत्रसंचालन डॉ. स्वाती मेश्राम यांनी केले

 

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्यuniversityविद्यापीठ