नाशिक : जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला महापूर आला असून, सुरक्षिततेच्या कारणास्तव महावितरणने गोदाकाठावरील सुमारे ७२ रोहित्रे बंद केली आहेत. याबरोबरच निफाड येथील नदीकाठावरील गावांमध्येदेखील पाणी शिरल्यामुळे नदीकाठावरील ७८ पेक्षा अधिक रोहित्रे बंद करण्यात आली आहे. पावसाचा जोर सायंकाळी कमी झाल्यानंतर येथील दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, अंबड सबस्टेशनमधील नियंत्रण कक्षात पाणी शिरल्यामुळे सबस्टेशन तात्पुरते बंद करण्यात आलेले आहे. सबस्टेशनमधील पाणी ओसरल्याशिवाय वीजप्रवाह सुरळीत होणार नसल्याने याचा फटका औद्योगिक वसाहतीला बसला आहे.शहर उपविभाग एकमधील ११ केव्ही वाहिनीवरील गोदावरीच्या पात्राजवळील काही रोहित्रांची पेटी पाण्याखाली गेली असल्यामुळे व काही भागांमधून तक्र ारी आल्यामुळे ११ केव्ही गोदावरी फिडर बंद ठेवण्यात आला. गोदावरी नदीच्या काठावरील जवळपास ३० रोहित्रे बंद ठेवली आहेत. सीबीएस, पिनॅकल मॉल, जिल्हाधिकारी कार्यालय जवळ परिसरातील मिनी पिलर बंद ठेवले आहेत. डीजेपीआय सेक्शनमधील एका ठिकाणी एक डीटीसी स्ट्रक्चर झुकलेले आहे. शहरातील ११ केव्ही वाहिनीवर झाड पडल्याने फिडरवरील पुरवठा अंशत: बंद पडला होता. सदर पुरवठा सुरळीत करण्याचे कार्य सुरू होते. द्वारका उपविभागात पाण्याची पातळी वाढल्यामुळे इंदिरानगर भागातील भारतनगर व खोडेनगर येथील पुरवठा बंद ठेवण्यात आला.नाशिक शहर उपविभाग दोनमध्ये गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे विविध ३३/११ उपकेंद्रावरील ११ केव्ही वडनेर, घरकुल, सद्गुरू, कल्पतरू एफडीआर, एकलहरे, सावळी, नायगाव, जाखोरी, जोगलटेंबी, धामणगाव, कोटमगाव, एकलहरे, सामनगाव, हिंगणवेढे, पॉलिटेक्निक तसेच देवळालीमधील ११ केव्ही तोफखाना वाहिनी, ३३ केव्ही अंबडवरील गिरणारे, त्र्यंबक एक्स्प्रेस, त्र्यंबक आणि गिरणारे उपकेंद्र येथील गंगाम्हाळुंगी या सर्व वाहिन्यांचा समावेश आहे.
गोदाकाठावरील ७२ रोहित्रे सुरक्षिततेसाठी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2019 7:09 PM
नाशिक : जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला महापूर आला असून, सुरक्षिततेच्या कारणास्तव महावितरणने गोदाकाठावरील सुमारे ७२ रोहित्रे बंद ...
ठळक मुद्देउपाययोजना : अंबड सबस्टेशनमध्ये शिरले पाणी; कर्मचाऱ्यांची गस्त