नाशिक : नाशिक, अहमदनगर, पुणे व औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये वास्तव्यास असलेले तसेच ग्रामीण पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेल्या १७ सराईतांच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून, त्यांच्याकडून चोरीचा १३ लाख १२ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़पोलीस अधीक्षक संजय दराडे व अतिरिक्त पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी दरोडा, जबरी चोरी, घरफोडी तसेच चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या संशयितांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते़ त्यानुसार पोलीस निरीक्षक अशोक करपे व पथकाने मालेगाव, येवला, इगतपुरी, सिन्नर तसेच अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, कोपरगाव, शिर्डी तसेच पुणे जिल्ह्यातील शिरूर; औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण, वैजापूर या ठिकाणी जाऊन रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा शोध घेतला़पोलिसांनी या सराईत गुन्हेगारांचा शोध घेत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यांच्या तपासात १७ संशयितांवर पाळत ठेवून त्यांना ताब्यात घेतले़ या गुन्हेगारांकडून घरफोडीचे ७ चोरीचे ९, जबरी चोरीचे २ असे एकूण १८ गुन्हे उघडकीस आले़ त्यांच्याकडून ५५ मोबाइल, १० दुचाकी, २ चारचाकी, १ लॅपटॉप, १ टीव्ही, २ इलेक्ट्रीक मोटर वायर असा १३ लाख १२ हजार ४४० रुपयांचा ऐवज जप्त केला़ मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, मच्छिंद्र रणमाळे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाºयांनी या मोहिमेत सहभाग घेतला होता़
१७ सराईत गुन्हेगारांकडून १३ लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 11:17 PM
नाशिक : नाशिक, अहमदनगर, पुणे व औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये वास्तव्यास असलेले तसेच ग्रामीण पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेल्या १७ सराईतांच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून, त्यांच्याकडून चोरीचा १३ लाख १२ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़पोलीस अधीक्षक संजय दराडे व अतिरिक्त पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी दरोडा, जबरी चोरी, घरफोडी ...
ठळक मुद्देग्रामीण पोलिसांच्या रेकॉर्डवर सराईतपोलीस अधीक्षक संजय दराडे व अतिरिक्त पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड कारवाईचे आदेश