शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

तेलंगणा पोलिसांच्या ताब्यातील नाशिकच्या सराफाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 11:59 PM

तेलंगणा राज्यातील सायबराबाद पोलीस आयुक्तालयातील विविध गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मुख्य पथक घरफोड्या, दरोडेसारख्या गंभीर गुन्ह्यांच्या तपासाकरिता नाशिकला आले. दरम्यान, या पथकाने घरफोडीतील मुख्य संशयिताने दिलेल्या कबुलीवरून पंचवटीतील संशयित सराफ व्यावसायिक विजय बुधू बिरारी (४५) यांना चौकशीसाठी सोमवारी (दि.२४) ताब्यात घेतले. मंगळवारी (दि.२५)पथकाच्या ताब्यात असताना बिरारी यांचा शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीवरून कोसळून मृत्यू झाला.

नाशिक : तेलंगणा राज्यातील सायबराबाद पोलीस आयुक्तालयातील विविध गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मुख्य पथक घरफोड्या, दरोडेसारख्या गंभीर गुन्ह्यांच्या तपासाकरिता नाशिकला आले. दरम्यान, या पथकाने घरफोडीतील मुख्य संशयिताने दिलेल्या कबुलीवरून पंचवटीतील संशयित सराफ व्यावसायिक विजय बुधू बिरारी (४५) यांना चौकशीसाठी सोमवारी (दि.२४) ताब्यात घेतले. मंगळवारी (दि.२५)पथकाच्या ताब्यात असताना बिरारी यांचा शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीवरून कोसळून मृत्यू झाला.सायबराबाद पोलिसांच्या या कारवाईबाबत कुठल्याही प्रकारची माहिती स्थानिक पोलिसांना नव्हती. त्यामुळे ही कारवाई संशयाच्या भोवºयात सापडली आहे. मयत बिरारी यांच्या नातेवाइकांनी सायबराबाद पोलिसांच्या तपासी पथकावर घातपाताचा आरोप जाहीररीत्या पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्याशी बोलताना केला.सायबराबाद आयुक्तालय हद्दीत लुटलेल्या मुद्देमालाच्या चौकशीसाठी गुन्हे शोध पथकाचे सुमारे आठ ते दहा कर्मचाऱ्यांचे विशेष पथक आरोपी प्रकाश उर्फ नाग्या शिंदे (रा. औरंगाबादरोड) यास घेऊन दोन दिवसांपासून शहरात मुक्कामी आले आहेत. या गुन्ह्णात पथकाने संशयावरून चौकशीसाठी (बेस्ड कस्टडी) बिरारी व त्यांच्या दुकानातील एका कारागिराला ताब्यात घेतले होते. घरफोड्यांमध्ये लुटलेले दागिने सराफाला विक्री केल्याची कबुली प्रकाशने तपासी पथकाला दिल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. यावरून त्या पथकाने बिरारी यांना अटक करून चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशी सुरू असताना अचानकपणे बिरारी हे विश्रामगृहाच्या चौथ्या मजल्यावरून कोसळून ठार झाल्याची घटना घडली. सायबराबाद पोलिसांच्या ताब्यातून निसटून बिरारी यांनी आत्महत्या केल्याची माहिती स्थानिक पोलिसांना दिली.

टॅग्स :Deathमृत्यूPoliceपोलिस