शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
मुख्यमंत्रि‍पदावरून नाराज असल्याची चर्चा; आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
3
चांगल्या कामासाठी मराठी माणसं एकत्र येणं चांगलेच; आमदार महेश सावंत यांचं विधान
4
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
5
LIC नं सप्टेंबर तिमाहित केली ३८००० कोटींच्या शेअर्सची विक्री, तुमच्याकडे आहेत का ‘हे’ स्टॉक्स?
6
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट, राज्यातील या २३ जिल्ह्यांत फोडता आला नाही भोपळा
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
8
वॉरेन बफेट यांनी आपला उत्तराधिकारी ठरवला, दान केले १.१ अरब अमेरिकी डॉलरचे शेअर
9
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
11
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
12
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
13
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
14
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
15
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
16
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
17
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
19
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
20
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट

नाशिकच्या बांधकाम व्यवसायाला कोरोनामुळे ‘स्लो-डाऊन’चा धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 5:07 PM

बांधकाम क्षेत्रासाठी यंदाचा गुढीपाडवा पुन्हा कधीच उगवू नये, असाच ठरला. संचारबंदीमुळे इच्छुक ग्राहकदेखील साईटवर किंवा कार्यालयांपर्यंत पोहोचू शकले नाहीत.

ठळक मुद्देबांधकाम क्षेत्र स्थिरस्थावर होण्यासाठी काही कालावधी लागणारजीवाचीच भीती असल्याने मजूर आपापल्या गावी स्थलांतरीत

नाशिक : कोरोनाचा प्रभाव जगभरातील प्रत्येक उद्योग व्यवसायावर पडत असून नाशिकच्या बांधकाम व्यवसायाला गत काही काळापासून असलेल्या मरगळीला कोरोनाच्या प्रभावाने अजूनच स्लो डाऊनचा धक्का सहन करावा लागणार आहे. मात्र, काही काळानंतर पुन्हा परिस्थिती पूर्व पदावर येईल, असा विश्वासदेखील नाशिकच्या बांधकाम व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.बांधकाम क्षेत्रासाठी यंदाचा गुढीपाडवा पुन्हा कधीच उगवू नये, असाच ठरला. संचारबंदीमुळे इच्छुक ग्राहकदेखील साईटवर किंवा कार्यालयांपर्यंत पोहोचू शकले नाहीत. त्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या बांधकाम व्यावसायिकांशी साधलेल्या संवादात मजूरांचे स्थलांतर, बांधकामांना काहीसा विलंब यासह अन्य काही अडथळे येणार असले तरी बांधकाम क्षेत्र स्थिरस्थावर होण्यासाठी काही कालावधी लागणार असला तरी त्यातून नाशिकचे बांधकाम क्षेत्र पुन्हा बहरेल, असेही त्यांनी नमूद केले.---प्रकल्प विलंबाबत विचार व्हावासद्यस्थितीत लोकांना जीवाचीच भीती असल्याने मजूर पूर्वीच आपापल्या गावी स्थलांतरीत झाले आहेत. त्या मजूरांना पुन्हा कामावर आणणे, विस्कटलेली घडी पुन्हा स्थिरस्थावर करणे यासाठी काही काळ लागणारच आहे. त्यामुळे शासनाने भविष्यात रेरामध्ये नोंद झालेल्या प्रकल्पांच्या विलंबासाठी डेट वाढवून द्यावी. तसेच कोरोनाचा बीमोड झाल्यानंतर काही विशेष पॅकेजदेखील द्यावा लागेल. एकूणातच सर्वच अर्थव्यवस्थेला हादरा बसणार असल्याने शासनाला त्याबाबत गांभिर्याने विचार करावा लागेल.- नरेश कारडा, कारडा कन्स्ट्रक्शन

नोंदणी नसलेल्या मजूरांनाही मदत मिळावीया व्यवसायात मजूर प्रामुख्याने युपी, बिहार, मराठवाडा आणि विदर्भातील असून सध्याच्या स्थितीत बहुतांश मजूर गावी परतले आहेत. नोंदणीकृत मजूरांना शासन मदत करणार असले तरी ज्या मजूरांची नोंदणी झालेली नाही, त्यांनादेखील शासनाने मदत दिल्यास ते सध्याच्या परिस्थितीशी मुकाबला करु शकतील. कोरोनामुळे बांधकाम प्रकल्पांना विलंब तसेच त्यामुळे कन्स्ट्रक्शन कॉस्ट वाढण्याची शक्यता आहे. किती काळ त्यातून बाहेर पडायला लागेल, ते अनिश्चित असले तरी त्यातून बाहेर पडू असा विश्वास वाटतो.- रवी महाजन, रवी महाजन बिल्डर्स अ‍ॅन्ड डेव्हलपर्स

परिस्थिती अधिक ढासळू नयेया व्यवसायावर अवलंबून असलेल्या किमान ५० निरनिराळ्या व्यावसायिक आणि प्रचंड प्रमाणातील मजूरांना या सर्व स्थितीचा मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे शासनाने सर्वप्रथम या सामान्यांची काळजी आणि सुरक्षितता यांना प्राधान्य द्यावे. समाजातील प्रत्येक घटकाचाच शासनाला विचार करावा लागणार असून परिस्थिती काही काळानंतर निश्चितपणे पूर्वपदावर येईल. त्यानंतर बांधकाम क्षेत्राची स्थिती अधिक ढासळू नये, अशा उपाययोजना शासनाने कराव्यात.- दीपक चंदे, दीपक बिल्डर्ससध्याची स्थिती तात्पुरतीजगातील प्रत्येक क्षेत्रावरच या स्थितीचा परिणाम होणार आहे. मात्र, ही परिस्थिती केवळ तात्पुरत्या स्वरुपातील आहे. त्यामुळे बांधकाम व्यवसायाची गती काहीशी मंदावेल. परंतु, त्याचा प्रदीर्घ काळ परिणाम होणार नाही. ज्यांचे व्यवहार चांगले असतील, ज्यांचे काम चांगले असेल अशा कंपन्याच या स्थितीतून लवकर सावरु शकतील. थोडाफार जो परिणाम होईल, त्याबाबत शासनदेखील भविष्यात मदत करेल.- निखिल रुंगटा, रुंगटा ग्रुप

 

टॅग्स :NashikनाशिकCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMarketबाजार