शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

नाशिकचा पुष्पोत्सव राज्यात अद्वितीय : अभिनेत्री महंगाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 1:15 AM

गुलाबाचे विविध प्रकार आणि अन्य सारी फुले नाशिकमध्ये बघितली आणि निसर्गाविषयी खूप शिकायला मिळाले. नाशिकचा असा पुष्पोत्सव राज्यभरात पहायला मिळणार नाही, असे भावोद््गार ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेतील राणू अक्काची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री अश्विनी महांगडे यांनी काढले. नाशिक महापालिकेच्या वतीने आयोजित पुष्पोत्सवाचा शुभारंभ गुरुवारी (दि.२०) करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

ठळक मुद्दे महापालिकेत दरवळला सुगंध

नाशिक : गुलाबाचे विविध प्रकार आणि अन्य सारी फुले नाशिकमध्ये बघितली आणि निसर्गाविषयी खूप शिकायला मिळाले. नाशिकचा असा पुष्पोत्सव राज्यभरात पहायला मिळणार नाही, असे भावोद््गार ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेतील राणू अक्काची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री अश्विनी महांगडे यांनी काढले. नाशिक महापालिकेच्या वतीने आयोजित पुष्पोत्सवाचा शुभारंभ गुरुवारी (दि.२०) करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी, त्याने ती स्वत: लावावी आणि संगोपन करावे याचा राज्यभर प्रचार करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.महापालिकेच्या मुख्यालयात पुन्हा एकदा पुष्पोत्सवाने सुगंध दरवळला. अभिनेत्री अश्विनी महंगाडे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद््घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर सतीश कुलकर्णी होते, तर व्यासपीठावर उपमहापौर भिकुबाई बागूल, सभागृह नेते सतीश सोनवणे, भाजपा गटनेते जगदीश पाटील, शिवसेना गटनेता विलास शिंदे तसेच विविध विषय समित्यांचे सभापती आणि उद्यान विभागाचे उपआयुक्त शिवाजी आमले उपस्थित होते.पर्यावरण विषयक खूप गोष्टी नाशिकमध्ये बघायला आणि शिकायला मिळाल्या. शहरात ६० लाख झाडे लावण्याचा मनोदय आणि एका व्यक्तीने तीन झाडे लावायला हवी हे सुद्धा कळले. भावीपिढीला पुस्तकांबरोबरच अशा पुष्पांचाही अभ्यास करण्यास सांगायला हवे. मोबाइलच्या व्यसनातून बाहेर काढून मुलांना फुलांचे जग दाखविले आणि त्यांची माहिती दिली तर ते अधिक संपन्न होतील ,असेही महंगाडे म्हणाल्या. यावेळी महापौर सतीश कुलकर्णी यांनी नाशिक शहर पर्यावरणीय दृष्टिकोनातून समृद्ध असल्याचे सांगून पुष्पोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले. सतीश सोनवणे, विलास शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत अजिंक्य साने यांनी केले. प्रास्ताविक चंद्रकांत खाडे यांनी केले. सूत्रसंचालन सीमा पेठकर यांनी केले, तर आभार श्याम साबळे यांनी मानले.इन्फो...नाशिक माझे सेकंड होम !नाशिकशी माझे अतुट नाते जोडले गेले आहे. कारण येथे खूप साºया चांगल्या गोष्टी होतात. येथील वातावरण चांगले आहे, या शहराविषयी आकर्षण वाटते. त्यामुळे नाशिकला माझे सेकंड होम असावे असे वाटतं असे सांगून अभिनेत्री महंगाडे यांनी नाशिककर होण्याचा मनोदय व्यक्त केला. राणू अक्काच्या वेशभूषेत आलेल्या महंगाडे यांनी मालिकेतील खणखणीत संवाद सादर केला आणि जिजाऊ, शिवराय तसेच संभाजी यांचा जयजयकार करताच टाळ्यांचा कडकडाट झाला.

सोनू काठे यांना ‘गुलाब राजा’ पुरस्कारस्पर्धात्मक पुष्पप्रदर्शनात ‘गुलाब राजा’ पुरस्कारचे सोनू रमेश काठे हे मानकरी ठरले, तर पुष्पक फ्लोरिटेक यांच्या गुलाबाला ‘गुलाब राणी’चा बहुमान मिळवला. ‘गुलाब राजकुमार’ पुरस्कार पपया नर्सरीने, तर ‘गुलाब राजकुमारी’ पुरस्कार बाबुलाल नर्सरीने पटकावला. फुलराणी ट्रॉफी बाबुलाल नर्सरीनेच मिळवली. सर्वोत्तम तबक उद्यान स्पधेत अरुण पाटील अव्वल राहिले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcultureसांस्कृतिक