इगतपुरी : महाराष्ट्र कोल्हापुर केसरी अश्व नृत्य स्पर्धा कोल्हापूर येथे या स्पर्धेचे संयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये वाघेरे येथील पोलिस पाटील पांडुरंग भोर व परिवाराने आपल्या गणु अन् सोनु या दोन घोड्यांनी हलगी झांजेच्या तालावर विविध नृत्य कला, कौशल्य व आपलं कसब दाखवून नृत्य स्पर्धेत अव्वल क्र मांक पटकावून प्रथम क्र मांकाचं पारितोषिक १५००० रु पये रोख, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह पटकावून नाशिक जिल्ह्याच नाव रोशन केले आहे.महाराष्ट्राच्या कोल्हापूर केसरी अश्व नृत्य स्पर्धेत केलेल्या कामिगरीचे आनंदतरंग फाऊंडेशनचे शाहीर उत्तम गायकर यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रातून गणू आणि सोनु अश्वांचं कौतुक होत असून परिसरातील अनेक शेतकरी, शौकीन मंडळी वाघेरे येथे गणु व सोनु अश्वांना पाहण्यासाठी गर्दी करीत आहे.या स्पर्धेसाठी योगेश मालुजंकर, उमेश मालुजंकर, सतीश भोर, प्रकाश भगत, शिवाजी खातळे, राहुल गवते, सलिम पठाण, रोहीत भोर, ऋषीकेश भोर, विक्र म शिदें, रफिक फिटर, गणेश आडके, वाळु भोर, राजु काजळे, ज्ञानेश्वर कोकणी यांचे योगदान लाभले. पिंपळगाव बसवंत येथील अश्व नृत्य शिक्षक सलीम पटेल व मालक समाधान भोर, धनराज भोर यांनी त्याकरीता विशेष परिश्रम घेतले.(फोटो २४ वाघेरा)
कोल्हापूरच्या अश्व नृत्य स्पर्धेत नाशिकचे गणु अन् सोनु प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 5:42 PM
इगतपुरी : महाराष्ट्र कोल्हापुर केसरी अश्व नृत्य स्पर्धा कोल्हापूर येथे या स्पर्धेचे संयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये वाघेरे येथील पोलिस पाटील पांडुरंग भोर व परिवाराने आपल्या गणु अन् सोनु या दोन घोड्यांनी हलगी झांजेच्या तालावर विविध नृत्य कला, कौशल्य व आपलं कसब दाखवून नृत्य स्पर्धेत अव्वल क्र मांक पटकावून प्रथम क्र मांकाचं पारितोषिक १५००० रु पये रोख, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह पटकावून नाशिक जिल्ह्याच नाव रोशन केले आहे.
ठळक मुद्देइगतपुरी : वाघेरेच्या वारु ने मिळवला कोल्हापूरचा सन्मान!