गिरणारे : शहरात जरी पावसाची प्रतीक्षा कायम असली तरी जिल्ह्याचे कोकण म्हणून ओळखल्या जाणाºया त्र्यंबकेश्वर व नाशिक तालुक्यात पावसाची दमदार सुरुवात झाली आहे. यामुळे पर्यटकांना नाशिकचे ‘कोकण’ भुरळ घालू लागले आहे. पावसाळी सहलींसाठी शहरवासीयांची पावले आता या कोकणाकडे चालू लागली आहे.मागील आठवड्यापर्यंत दडी मारलेल्या पावसाने अचानक पुन्हा आगमन केल्याने त्र्यंबकेश्वर, नाशिक तालुक्याने हिरवा शालू पांघरला आहे. चहुबाजूंनी वेढलेली सह्याद्रीची पर्वतरांग हिरवाईने नटली आहे. या नटलेल्या पर्वतरांगांवरुन फेसाळणारे पांढरे शुभ्र धबधबे वाहू लागले आहे. हे धबधबे जणू या डोंगरकड्यांचे ‘दागिने’ भासत आहेत. या निसर्गसौंदर्याचे शहरवासीयांमध्ये आकर्षण वाढले असून, नाशिकसह गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांमधील भाविक त्र्यंबकेश्वर येथील देवदर्शन आटोपून पावसाळी सहलींचा आनंद या भागात लुटताना दिसत आहेत. भटकंती करतांना विविध जातीचे वृक्ष, रानभाज्या, फुलं, रानफुलं, पक्ष्यांची घरटी यांचं जवळून निरिक्षण करतानाही काही निसर्गप्रेमी नजरेस पडत आहेपर्यटकांच्या वाढत्या गर्दीबरोबरच या तालुक्यांमध्ये बळीराजाची लगबगही नजरेस पडत आहे. शेतीच्या कामांनी वेग घेतला असून, नांगरणी पूर्ण झाल्याने लवकरच भात लावणीच्या कामाला सुरुवात होणार असल्याचे चित्र आहे. यंदा पावसाने उशिरा दमदार हजेरी लावल्यामुळे या तालुक्यांमध्येही यंदा शेतीच्या कामांना विलंब झाला; मात्र जुलै महिना उजाडताच पावसाची पुन्हा ‘एन्ट्री’ झाल्याने दुबार पेरणीचे संकट टळले.त्र्यंबकेश्वर-घोटी रस्त्यावर नाशिककरांची धम्माल४त्र्यंबकेश्वर-घोटी हा मार्ग पावसाळी सहलींसाठी प्रसिध्द आहे. या मार्गावर असलेल्या घाटाच्या दुतर्फा असलेले सह्याद्रीचे उंचचउंच डोंगर जणू धुक्यामध्ये हरविले असल्याचा भास पर्यटकांना होतो. पाऊसधारांचा वर्षाव अंगावर झेलत पर्यटक छायाचित्रांची हौस भागविताना दिसतात. पेगलवाडी, पहिने या आदिवासी गावातील गावकºयांना पर्यटकांच्या सहलींमुळे काही प्रमाणात रोजगारही उपलब्ध होताना दिसतो.‘वाघेरा’चे बहरले सौंदर्यपावसाच्या आगमनाने हरसूल-वाघेरा घाटाला हिरवाईचे कोंदण लाभले आहे. हा घाट वाघेरा पाडा ते नाकेपाडापर्यंत सात किलोमीटरचा आहे. वनौषधींसाठी घाटाचा परिसर प्रसिद्ध आहे. काळानुरूप या घाटामध्येही अतिक्रमण वाढीस लागल्याने वनौषधी नष्ट होऊ लागल्या आहेत. दरडी कोसळण्याचा धोका घाटात अधिक असल्याने पर्यटकांनी पावसाळी सहलीचा आनंद घाटात लुटताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. या घाटात लावण्यात आलेल्या सूचना फलकांकडे दुर्लक्ष करणे दुर्घटनांना निमंत्रण देणारे ठरू शकते.
भुरळ घालतंय नाशिकचं ‘कोकण’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2018 10:50 PM
गिरणारे : शहरात जरी पावसाची प्रतीक्षा कायम असली तरी जिल्ह्याचे कोकण म्हणून ओळखल्या जाणाºया त्र्यंबकेश्वर व नाशिक तालुक्यात पावसाची दमदार सुरुवात झाली आहे. यामुळे पर्यटकांना नाशिकचे ‘कोकण’ भुरळ घालू लागले आहे. पावसाळी सहलींसाठी शहरवासीयांची पावले आता या कोकणाकडे चालू लागली आहे.
ठळक मुद्देपावसाळी सहलींची गर्दी आदिवासी भागातील डोंगरदऱ्यांना चढला हिरवाईचा साज