शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

नाशिकचे किमान तपमान १७.७ अंशावर तरी नाशिककरांना सहा तासांपासून भरली हुडहुडी; ‘ओखी’च्या प्रभावामुळे हवेत कमालीचा गारठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 1:49 PM

अहमदनगर, नाशिक, जळगाव, पालघर, ठाणे, नंदूरबार आदि जिल्हे प्रभावीत झाले आहेत. या जिल्ह्यांमध्ये मंगळवारी पहाटेपासूनच वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. नाशिकमध्ये पहाटेपासूनच रिमझिम पाऊस सुरू झाला असून हवेत कमालीचा गारवा जाणवत आहे.

ठळक मुद्देदक्षिण भारताच्या किनारपट्टीवरून पुढे सरकत ‘ओखी’ गुजरातमध्ये पोहचलाउत्तर महाराष्ट्रातील समुद्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा १७ अंशाच्या पुढे किमान तपमानाचा पारा, नाशिककर सध्या कडाक्याच्या थंडीचा अनुभव घेत आहेत. पहाटेपासून शहरात मळभ दाटले असून रिमझिम पावसाबररोबरच हवेत प्रचंड गारवा

नाशिक : नाशिकचे किमान तपमानात गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. १४ अंशावरून पारा थेट १७ अंशाच्या पुढे गेला आहे. एकूणच किमान तपमानात वाढ होताना दिसत असली तरी नाशिककर मंगळवारी पहाटेपासूनच गारठले आहे. कारण ‘ओखी’ वादळ गुजरातमध्ये धडकल्यामुळे नाशिकवरही त्याचा मोठा प्रभाव जाणवू लागला आहे. पहाटेपासून शहरात मळभ दाटले असून रिमझिम पावसाबररोबरच हवेत प्रचंड गारवा निर्माण झाला आहे.दक्षिण भारताच्या किनारपट्टीवरून पुढे सरकत ‘ओखी’ गुजरातमध्ये पोहचला आहे. यामुळे अहमदनगर, नाशिक, जळगाव, पालघर, ठाणे, नंदूरबार आदि जिल्हे प्रभावीत झाले आहेत. या जिल्ह्यांमध्ये मंगळवारी पहाटेपासूनच वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. नाशिकमध्ये पहाटेपासूनच रिमझिम पाऊस सुरू झाला असून हवेत कमालीचा गारवा जाणवत आहे. यामुळे जनजीवन प्रभावीत झाले आहे. नाशिककरांना रेनकोटसोबत उबदार कपड्यांचाही आज वापर करावा लागत आहे. दैनंदिन कामासाठी बाहेर पडलेल्या चाकरमान्यांचे हाल झाले. उबदार कपड्यांसह रेनकोट परिधान करुन दुचाकीवरून महिला-पुरूष नोकरदार वर्ग मार्गस्थ होताना दिसून आले. एकूणच १७ अंशाच्या पुढे किमान तपमानाचा पारा असतानाही नाशिककर सध्या कडाक्याच्या थंडीचा अनुभव काही तासांपासून घेत आहेत. कारण ‘ओखी’ मुंबईपासून पश्चिमेला ३०० किलोमीटर आणि सुरतेपासून दक्षिणेला ४८० किलोमीटरवरून पुढे वेगाने सरकत असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. उत्तर महाराष्ट्रातील समुद्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा सुटल्याने समुद्र खवळला असून मासेमा-यांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

ढगाळ हवामानामुळे किमान तपमानात वाढ होत असून दक्षिण भारताला तडाखा दिलेल्या ‘ओखी’ वादळाचा हा परिणाम असण्याची शक्यता हवामान निरिक्षण केंद्राकडून वर्तविली जात आहे. कारण दोन दिवसांपुर्वी शहराचे हवामान उत्तम होते. थंडीची तीव्रताही जाणवत होती आणि सुर्यप्रकाशही पडत होता; मात्र अचानकपणे रविवारपासून वातावरणात कमालीचा बदल होऊन ढग दाटण्यास सुरुवात झाली. सोमवारी (दि.४) पहाटेपासून थंडीचा कडाका कमी झाला होता. १६.१ इतके जास्त किमान तपमान नोंदविले गेले.

टॅग्स :Ockhi Cycloneओखी चक्रीवादळNashikनाशिकRainपाऊसnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय