नाशिक : राज्य परीक्षा मंडळाप्रमाणेच सीबीएसई बोर्डाचे देखील निकाल जाहीर झाले असून मूल्यांकनाच्या आधारावर जाहीर झालेल्या सीबीएसई परीक्षेत नाशिकच्या विद्यार्थ्यांची टक्केवारी वाढली आहे. यंदा एकूणच निकालाचा टक्का वाढला असल्याचेही दिसून येत आहे.
कोरोनामुळे यंदा सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनच्या निकालाचा पॅटर्न बदलण्यात आल्याने दहावी, अकरावी व बारावीच्या गुणांवर आधारित मूल्यांकन करीत निकाल जाहीर करण्यात आला. राज्याच्या दहावी बोर्डाप्रमाणेच केंद्रीय बोर्डाचा निकालही ९९.३७ टक्के इतका लागला आहे. या निकालात नाशिकमधील शाळांची निकालाची टक्केवारी वाढली आहे.
देवळाली कॅम्प येथील आर्मी पब्लिक स्कूलचा निकाल शंभर टक्के इतका लागला आहे. या शाळेतील ८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यातील १५ विद्यार्थ्यांनी ९५ टक्केच्या पुढे गुण मिळविले, तर ३० विद्यार्थ्यांनी ९० टक्केपेक्षा अधिक गुण मिळविले. शाळेत प्रिया कुमारी हिने प्रथम येण्याचा मान मिळविला असून तिने ९८ टक्के गुण मिळविले. त्याखालोखाल दोन विद्यार्थ्यांनी ९६.८ टक्के गुण मिळविले.
(सहा फोटो)
दिल्ली पब्लिक स्कूल शाळेचा निकालही शंभर टक्के लागला. विज्ञान शाखेचा निकाल ८६.३, वाणिज्य शाखेचा निकाल ८४.२, तर कला शाखेचा निकाल ८९ टक्के इतका लागला. विज्ञान शाखेतील विद्यार्थी कवीश सोनी याने ९६.९४ टक्के गुण मिळविले. आदिती राणे (९५.५३ टक्के) हिने दि्वतीय, ओमकार शिंदे (९४.२ टक्के) याने तृतीय क्रमांक मिळविला. वाणिज्य शाखेतील तन्वी मालपाणी हिने ९६.५६ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. जिवांश अग्रवाल (९६.३४ टक्के), संकेत काशिद-पाटील (९६ टक्के) यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळविला. मानवविज्ञान शाखेतून ९५ टक्के गुण मिळवत दिशा कोठावदे हिने प्रथम क्रमांक पटकावला.
नाशिक सिम्बॉयसेसमधील निकिता सावळा हिने ९५.६ टक्के गुणांसह शाळेत प्रथम क्रमांक पटकविला. सृष्टी जाधवने ९३.८ टक्के, तर अक्षय कोटकरने ९३.४ टक्के गुण मिळविले.
किशोर सूर्यवंशी इंटरनॅशनल स्कूलचा निकाल देखील १०० टक्के लागला आहे. आराध्या मोराणकर हिने ९१ टक्के गुण मिळवत प्रथम, तर विशाखा किर्वे हिने ९०.८ टक्के गुण मिळवत दुसरा क्रमांक पटकाविला.
केंब्रीज शाळेनेही घवघवीत यशाची परंपरा कायम राखली. विज्ञान शाखेत शाळेतील ओंकार तिडके (९६.४), अश्विन कुमावत ९६.०, मुकुल यादव (९५.२) टक्के गुण मिळवून ते अनुक्रमे प्रथम, दि्वतीय अणि तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेतून निधी बोथरा (९५.२), प्राजक्ता बोरसे (९५.२), तर दि्वतीय क्रमांक भाविक गौडाने (९३.४) तृतीय क्रमांक, तर संजीवनी सिंगने (९३) टक्के गुण मिळविले. कला शाखेत अचसा बोसने (७८.४) टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला.