शहरं
Join us  
Trending Stories
1
महत्वाची अपडेट! देशाचा अर्थसंकल्प २३ जुलैला मांडला जाणार; मोदी ३.० काय काय घोषणा करणार? 
2
पुढच्यावेळी 'या' मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार; महादेव जानकरांनी थेट मतदारसंघच सांगितला
3
PM आवासचा पहिला हप्ता मिळताच 11 महिला प्रियकरासोबत 'भुर्र'! पती म्हणतायत, दुसरा हप्ता देऊ नका
4
धावत्या बाइकवर रिल्स बनवताना आयुष्य थांबले; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याचे पाय निकामी
5
IND vs ZIM Live : वडिलांसाठी भावनिक क्षण! लेक रियान परागला पदार्पणाची सोपवताना 'बाप'माणूस भारावला
6
मुंबईत १ कोटीचा फ्लॅट, ऑडी कार, असा पकडला गेला करोडपती चोर, लाईफस्टाईल पाहून पोलीसही अवाक्
7
कोणाची मध्यस्थी फळली? हमास-इस्त्रायल युद्ध थांबणार; या छोट्या देशाने निभावली महत्वाची भुमिका
8
ना हॉटस्टार, ना Jio Cinema! India vs Zimbabwe Live मॅच कुठे पाहायची? वाचा सविस्तर
9
IND vs ZIM Live : WHAT A BALL! मुकेश कुमारने पहिल्याच चेंडूवर उडवला त्रिफळा; फलंदाज चीतपट
10
जिओचा ग्राहकांना दुसरा धक्का! आधी किंमती वाढवल्या, आता Jio'ने 'हे' OTT वाले प्लॅनही केले बंद
11
‘राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेला अदानी-अंबानी दिसले, पण अडवाणी नाही…’ राहुल गांधींची मोदींवर टीका   
12
Ramayan: वनवासात चौदा वर्षं न झोपलेल्या लक्ष्मणाची झोप कोणाला मिळाली? वाचा!
13
"नरेंद्र मोदी देशातील भ्रष्ट लोकांचे सरदार, वायकरही भाजपाच्या वॉशिंग मशिनमधून स्वच्छ’’,  नाना पटोले यांची टीका 
14
IND vs ZIM 1ST T20I Live : भारताने टॉस जिंकला! ३ युवा खेळाडूंचे टीम इंडियात पदार्पण; गिल नव्या इनिंगसाठी सज्ज
15
Anant-Radhika Wedding : 'संगीत समारंभा'त विश्वविजेत्यांचे 'हार्दिक' स्वागत; नीता अंबानी यांना अश्रू अनावर, Video
16
टेस्लाला शाओमीचा धोबीपछाड! इलेक्ट्रीक कार SU7 भारतात या दिवशी लाँच होणार
17
मुहूर्त ठरला! अजितदादांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लागणार; माजी महापौरांसह नगरसेवकांच्या हाती लवकरच तुतारी 
18
कहरच झाला! साप दोनवेळा डसला म्हणून तरुण त्याला तीनवेळा चावला; साप मेला, तरुण वाचला
19
"राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून मला केवळ देवच बाहेर करू शकतो", जो बायडन यांनी ठणकावले  
20
टेलिव्हिजनवरील अभिनेत्रीने पतीला गर्लफ्रेंडसोबत पकडलं रंगेहाथ, वर्षभरात मोडला संसार, आता जगतेय सिंगल लाइफ

ड्रग्जमाफिया ललितला भल्या पहाटे मुंबई पोलिसांनी घडविली नाशिकची 'व्हीसीट'!

By अझहर शेख | Published: October 22, 2023 1:50 PM

ललित पाटील हा मूळ नाशिकचा आहे. नाशिकमध्ये त्याने ड्रग्जची फॅक्टरी शिंदे गावात चालविली होती ही फॅक्टरी सकिनाका पोलिसांनी पंधरवड्यापूर्वी उद्धवस्त केली.

नाशिक : ड्रग्जमाफिया संशयित ललित पाटील (पानपाटील) ला अटक केल्यानंतर मुंबई पोलीस रविवारी पहाटे त्याला एका खासगी कारमधून नाशिकमध्ये घेऊन दाखल झाले होते. ललित सध्या पोलीस कोठडीत आहे. 

ललित पाटील हा मूळ नाशिकचा आहे. नाशिकमध्ये त्याने ड्रग्जची फॅक्टरी शिंदे गावात चालविली होती ही फॅक्टरी सकिनाका पोलिसांनी पंधरवड्यापूर्वी उद्धवस्त केली. पुणे पोलिसांच्या तावडीतून ससून रुग्णालयात उपचार घेताना ललित 2 ऑक्टोबर ला निसटला होता. त्यानंतर तो थेट नाशिकला आला. येथील त्याच्या दोन निकटवर्तीय महिलांना भेटला संशयित अर्चना निकमच्या पंचवटी येथील फ्लॅटमध्ये वास्तव्य केले. 25 लाखांची रोकड तिच्याकडून घेतल्यानंतर ललित या आर्थिक 'रसद'च्या जोरावर नाशकातून पळून गेला. यानंतर नाशिक पोलिसांनी संशयित निकम या महिलेला ताब्यात घेतले. तिची कसून चौकशी केली. तिच्याकडून ललित चा भाऊ भूषण याने दिलेली 7किलो चांदी नाशिक पोलिसांनी हस्तगत केली.

यानंतर निकम हिला पोलिसांनी पुणे पोलिसांच्या हवाली केले. ललित ला पळवून लावण्यासाठी मदत केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी निकम व तिची साथीदार प्रज्ञा कांबळे या दोघींना अटक केली आहे. एकूणच या एमडी ड्रग्ज प्रकरणाला सध्या नाशिक, मुंबई व पुणे अशा तीनही शहराच्या पोलिसांकडून तपासाला गती देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी तपासाला गती देण्यासाठी ललितला घेऊन नाशिकच्याशिंदे गावात रविवारी सकाळीच दाखल झाले. त्याने त्याचा भाऊ ड्रग्जचा मास्टरमाइंड भूषण पाटील च्या मदतीने उभारलेल्या एमडीड्रग्ज च्या फॅक्टरी वर पोलीस घेऊन गेले. सुमारे  तीन तास पोलीस ललित ला घेऊन नाशिकमध्ये तपास करत होते. याबाबत पोलिसांनी कमालीची गोपनीयता पाळली मात्र ते नाशिकमधून परतताना माध्यमांनी त्यांच्या कारला कॅमेऱ्यात टिपले. ललीतची ही नाशिक व्हीसीट 'मीडिया लीक' होऊ नये यासाठी मुबंई पोलिसांनी कमालीची खबरदारी घेत गोपनीयता पाळली होती. 

टॅग्स :Lalit Patilललित पाटीलPoliceपोलिसNashikनाशिकDrugsअमली पदार्थ