नाशिक: दोहा येथे सुरू झालेल्या आशियाई अॅथलेटिक्स अजिंक्यपद सपर्धेत नाशिकची धावपटू संजीवनी जाधव हिने पाच हजाार मीटरमध्ये चौथा क्रमांक मिळविला. बहरिन, चीन आणि कझाकीस्तानच्या धावपटूंसोबत स्पर्धा करणाऱ्या संजीवनीने सर्वस्वपणाला लावत उत्तम कामगिरी केली. पाच मिनिटांच्या अंतराने तीेचे कांस्यपदक हुकले.दोहा, कतार येथे सुरू असलेल्या आशियाई अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पधेतील पाच हजार मीटरमध्ये संजीवनीने १५:४१:१२ सेकंदाची वेळ नोंदवत चौथा क्रमांक मिळविला. भारताची पारूल चौधरी ही तिसºया क्रमांकावर राहिली.पटियाला येथील स्पर्धेतील पदक विजेत्या कामगिरीच्या आधारावर संजीवनीने या स्पर्धेची निवड झाली होती. अवघ्या काही मिनिटांनी तीचे पदक हुकले असले तरी तीने उत्कृष्ठ वेळेची नोंद केलेली आहे. पहिल्या दोन्ही स्थानावर बहिरनच्या महिला खेळाडू राहिल्या. स्पर्धेच्या दोन दिवस आगोदरच दोहा येथे पोहचलेल्या संजीवनीला सरावासाठी अवघा एकच दिवस मिळाला त्यामुळे तीला पदकविजेती कामगिरी करता आली नाही. मात्र चौथ्या क्रमांक राखून तीन स्वता:ला सिद्ध केले आहे. आता तीने १० हजार मीटर स्पर्धेकडे लक्ष केंद्रीत केले आहे. उद्या ती या स्पर्धेसाठी मैदानात उतरेल. दरम्यान, प्रशिक्षक विजेंद्रसिंग हिने तीच्या या कामगिरीविषयी समाधान व्यक्त केले आहे.
संजीवनी जाधव चौथ्या क्रमांकावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 1:21 PM
नाशिक : दोहा येथे सुरू झालेल्या आशियाई अॅथलेटिक्स अजिंक्यपद सपर्धेत नाशिकची धावपटू संजीवनी जाधव हिने पाच हजाार मीटरमध्ये चौथा ...
ठळक मुद्देआशियाई अॅथलेटिक्स : ५००० मीटर स्पर्धा