नाशिक :महाराष्ट्रराज्य सुरक्षा रक्षक मंडळातर्फे नियुक्त करण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकांना समाजकल्याण विभागात नियुक्त करण्याच्या सूचना समाजकल्याण आयुक्तांनी दिल्याने सुरक्षा रक्षकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरक्षा रक्षक मंडळाच्या कर्मचाऱ्याच्या नियुक्तीचा प्रश्न प्रलंबित असल्याने त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता.राज्य शासनाने १९८१च्या कायद्यांतर्गत स्थापन केलेल्या सुरक्षा रक्षक मंडळाकडून सरकारी आस्थापनेत सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्याचे आदेश दिलेले आहेत. मात्र समाजकल्याण विभागाने या आदेशाला न जुमानता सुरक्षारक्षकांना बेकायदेशीरपद्धतीने कामावरून कमी करून खासगी एजन्सीमार्फत सुरक्षा रक्षक नियुक्त केले होते. यासाठी सुरक्षा रक्षकांकडून सातत्याने पाठपुरावा सुरू होता. समाजकल्याण विभागाने २०११ पासून कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांना कामावरून काढून टाकताना कोणतेही लेखीपत्र दिलेले नाही. यामुळे सुरक्षा रक्षकांवर उपासमारीची वेळ आली होती.या संदर्भात सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, योगेश घोलप यांची संयुक्त बैठकही झाली होती. यावेळी सुरक्षा रक्षक मंडळाच्या सुरक्ष रक्षकांच्या नेमणुकीचे आदेश देण्यात आले होते. समाज कल्याण विभागाचे अधिकारी अ. का. लक्कस आणि अपर सचिव अहिरे यांनी नाशिक समाज कल्याण विभागाला सुरक्षा रक्षक मंडळातर्फे स्थापित सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्याच्या सूचना समाज कल्याण विभागाला दिलेल्या आहेत. त्यामुळे नोंदणीकृत सुरक्षारक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
सुरक्षा रक्षक मंडळाच्या सुरक्षा रक्षकांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 5:57 PM
नाशिक :महाराष्ट्रराज्य सुरक्षा रक्षक मंडळातर्फे नियुक्त करण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकांना समाजकल्याण विभागात नियुक्त करण्याच्या सूचना समाजकल्याण आयुक्तांनी दिल्याने सुरक्षा रक्षकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरक्षा रक्षक मंडळाच्या कर्मचाऱ्याच्या नियुक्तीचा प्रश्न प्रलंबित असल्याने त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता.
ठळक मुद्देनोंदणीकृत सुरक्षारक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्याच्या सूचना