शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
5
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
6
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
7
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
8
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
9
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
10
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
11
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
12
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
13
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
14
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
15
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
16
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
17
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
18
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
19
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
20
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?

श्रावणमासानिमित्त पंचवटीतील शिवमंदिरे सजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 4:34 PM

पंचवटी : श्रावणमासानिमित्त पंचवटीतील विविध शिवमंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (दि.१३) पहिला श्रावण सोमवार असल्याने कपालेश्वर महादेव मंदिरात विविध धार्मिक कार्यक्र म आयोजित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देश्री कपालेश्वर महादेव मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पंचमुखी मुखवट्याची सवाद्य पालखी मिरवणूक

पंचवटी : श्रावणमासानिमित्त पंचवटीतील विविध शिवमंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (दि.१३) पहिला श्रावण सोमवार असल्याने कपालेश्वर महादेव मंदिरात विविध धार्मिक कार्यक्र म आयोजित करण्यात आले आहे.पहाटे चार वाजता भाविकांसाठी मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे. सकाळी ६ ते दुपारी १२ पर्यंत श्रावणी सोमवारनिमित्ताने रु द्राभिषेक करण्यात येणार आहे. सकाळी मंदिरातील पुजारी अभिजित गाडे, अमोल थिटे, चिन्मय गाडे यांच्या उपस्थितीत महादेवाच्या पिंडीची पूजा करून अभिषेक व महाआरती करण्यात येईल. मुख्य मंदिरात रात्री भजनाचा कार्यक्र म होईल. सायंकाळी श्री कपालेश्वर मंदिरातून चांदीच्या पंचमुखी मुखवट्याची परिसरातून सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. पालखी मिरवणूक मालवीय चौक, शनि चौक, श्री काळाराम मंदिर, सरदार चौक, गंगाघाट, साईबाबा मंदिरमार्गे काढण्यात येऊन रामकुंडावर विधिवत पूजन करण्यात येईल. येथे आरती झाल्यानंतर कपालेश्वर मंदिरात महाआरती करून पालखीचा समारोप होईल. कपालेश्वर देवस्थानच्या वतीने संपूर्ण मंदिर परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे, तर मंदिराच्या गाभाऱ्यात सजावट करण्याचे काम करण्यात आले आहे. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मंदिरात जाण्यासाठी मुख्य दरवाजाने प्रवेश बंद करून भाविकांना दक्षिण दरवाजाने आत जाण्याची व उत्तर दरवाजाने दर्शन घेऊन बाहेर निघण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गंगाघाट परिसरातून मंदिराकडे जाणाºया मार्गावर दुचाकी व चारचाकी वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येऊन पायी ये-जा करणाºया भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे. मंदिर परिसरात शांतता व सुव्यवस्था टिकून रहावी यासाठी पोलीस कर्मचारी तसेच होमगार्ड तैनात करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली आहे.इन्फो बॉक्सप्रदक्षिणेस बंदीश्रावण महिन्यातील पहिला श्रावण सोमवार असल्याने मंदिरात देवदर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची गर्दी होणार आहे. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन उद्या सोमवारी सकाळी सहा ते रात्री उशिरापर्यंत मंदिराला प्रदक्षिणा मारण्यास मनाई करण्यात आली आहे. दर्शनाला येणाºया भाविकांना मदत केंद्र म्हणून कपालेश्वर विश्वस्त मंडळाच्या वतीने मंदिर परिसरात ध्वनिक्षेपक यंत्रणा सूचना कक्ष उभारला आहे.

टॅग्स :Nashikनाशिकgodavariगोदावरी