नाशिक: राम मंदिराचा मुद्या घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येत्या २५ रोजी आयोध्देला जाणार असून नाशिक जिल्ह्यातून देखील हजारो शिवसैनिक आयोध्देला जाणार आहेत. यापार्श्वभूमीवर शिवसेना कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीच मोठ्या संख्येने आयोद्धेला जाण्याचा निर्धार करण्यात आला.शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आयोजित बैठकीत शिवसेना महानगरप्रमुख महेश बडवे, सचिन मराठे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बडवे यांनी सांगितले की, येत्या २५ रोजी शिवसेना पक्षप्रमुख आयोद्धेला जाणार आहेत. त्यांच्यासोबत महाराष्टÑातील हजारो शिवसैनिक देखील जाणार असून नाशिक जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते घेऊन जाण्याचे नियोजन आहे. नाशिकरोड रेल्वेस्थानकातून यासाठी एका विशेष गाडीचे देखील नियोजन करण्यात आलेले आहे.मराठे म्हणाले की, गुरूवार दि. २२ २ोजी रात्री ११.३० वाजता ही गाडी नाशिक येथून निघेल ३० तासांच्या प्रवासानंतर शनिवारी दि. २४ रोजी सकाळी ८ वाजता गाडी फैजाबाद उत्तरप्रदेश येथे पोहचेल. रविवारी उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील त्यानंतर रविवारी रात्री आयोद्धेहून निघून मंगळवारी नाशिकरोडला येण्याचे नियोजन असल्याचे मराठे यांनी सांगितले. दरम्यान, निफाड, नांदगाव, मनमाड, येवला, नाशिकरोड, देवळाली येथील शिवसैनिक हे खासगी वाहनाने आयोद्धेला पोहचणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
आयोध्देला नाशिकहून हजारो शिवसैनिक जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 5:59 PM
राम मंदिराचा मुद्या घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येत्या २५ रोजी आयोध्देला जाणार असून नाशिक जिल्ह्यातून देखील हजारो शिवसैनिक आयोध्देला जाणार आहेत. यापार्श्वभूमीवर शिवसेना कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीच मोठ्या संख्येने आयोद्धेला जाण्याचा निर्धार करण्यात आला.
ठळक मुद्देबैठकीत मार्गदर्शन: नाशिकहून हजारो शिवसैनिक जाणार