शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

सिन्नर नागरी पतसंस्था फसवणुकीतील प्रमुख संशयित सूरज शहाला गुजरातहून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 10:12 PM

नाशिक : सिन्नर तालुक्यातील सिन्नर नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांच्या सुमारे ४४ कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणातील प्रमुख संशयित तथा महाराष्ट्र ठेवीदार हितसंबंध संरक्षण अधिनियम (एमपीआयडी) कायद्यान्वये गुन्हा दाखल असलेला सूरज प्रकाश शहा (४७, रा़शेटे गल्ली, सिन्नर) यास गुजरात व दीवदमन राज्याच्या सीमावर्ती भागातील जैन धर्मशाळेतून स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी (दि़२३) अटक केली़

ठळक मुद्देठेवीदारांची ४४ कोटी रुपयांची फसवणूकएमपीआयडीन्वये गुन्हा दाखलआॅगस्ट २०१७ पासून फरार

नाशिक : सिन्नर तालुक्यातील सिन्नर नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांच्या सुमारे ४४ कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणातील प्रमुख संशयित तथा महाराष्ट्र ठेवीदार हितसंबंध संरक्षण अधिनियम (एमपीआयडी) कायद्यान्वये गुन्हा दाखल असलेला सूरज प्रकाश शहा (४७, रा़शेटे गल्ली, सिन्नर) यास गुजरात व दीवदमन राज्याच्या सीमावर्ती भागातील जैन धर्मशाळेतून स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी (दि़२३) अटक केली़ २९ आॅगस्ट २०१७ पासून संशयित शहा हा पोलिसांना चकवा देत होता़

सिन्नर नागरी सहकारी पतसंस्थेच्या २०१४ ते २०१६ लेखापरीक्षण अहवालात संस्थेचे चेअरमन, संचालक, सरव्यवस्थापक व कार्यकारिणीने संगनमत करून संस्थेतील विनातारण कर्ज प्रकरणे, कर्ज बोजा नोंद न केलेल्या मिळकती, कर्ज असताना देण्यात आलेले नील दाखले, संस्थेच्या कार्यक्षेत्राबाहेर केलेले कर्जवाटप तसेच खोटे दस्तऐवज तयार करून संस्थेची व ठेवीदारांची ४३ कोटी ४८ लाख ४१ हजार ८२२ रुपयांची फसवणूक केली़ याप्रकरणी सनदी लेखापाल अजय राठी यांच्या फिर्यादीवरून सिन्नर पोलीस ठाण्यात २९ आॅगस्ट २०१७ रोजी एमपीआयडी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता़

सिन्नर पोलीस ठाण्यात दाखल या गुन्ह्याचा तपास ग्रामीणच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता़, तर संचालक मंडळातील १३ संशयितांना यापूर्वीच अटक करण्यात आली असली तरी पतसंस्थेचा अध्यक्ष व संशयित सूरज शहा हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झाला होता़ स्थानिक गुन्हे शाखेने शहा याचे नातवाईक, मित्रमंडळी यांच्याकडून माहिती मिळवून गिरसोमनाथ जिल्ह्यातून अटक केली़ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे, सहायक पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ, पोलीस नाईक प्रीतम लोखंडे, पोलीस शिपाई रवींद्र टर्ले, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, खांडेकर यांनी ही कामगिरी केली़आठ दिवसांपासून पथक गुजरातमध्येसंशयित सूरज शहा यांच्या शोधासाठी गेलेले स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आठ दिवसांपासून गुजरात राज्यात शोध घेत होते़ गुजरातमधील विविध शहरे, धार्मिक स्थळे, सुमारे २५० लॉज तसेच धर्मशाळांची या पथकाने तपासणी केली़ विशेष म्हणजे फरार झाल्यानंतर गुजरात, राजस्थान, दीव-दमण राज्यात शहा फिरत होता़ नाशिकपासून सुमारे एक हजार तीनशे किलोमीटरवरील जैन धर्मशाळेत लपून बसलेल्या शहा यास ताब्यात घेतल्यानंतर पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले आहे़जैन धर्मशाळेतून शहा ताब्यात

एमपीआयडी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाल्यानंतर चेअरमन तथा प्रमुख संशयित सूरज शहा हा फरार झाला होता़ त्याच्या शोधासाठी सीमेलगतचे जिल्हे तसेच परराज्यांतही पथके पाठविण्यात आली होती, मात्र तो हाती आला नव्हता़ यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे व त्यांच्या पथकाने तपास करून गुजरात राज्यातील गिरसोमनाथ जिल्ह्याच्या उणा तालुक्यातील अंजार येथील एका जैन धर्मशाळेतून त्यास ताब्यात घेतले़- संजय दराडे, अधीक्षक, नाशिक ग्रामीण 

टॅग्स :NashikनाशिकCrimeगुन्हाPoliceपोलिसArrestअटक