शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

सुरगाणा येथे अतिसाराची सहा जणांना लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 5:22 PM

नाशिक : सुरगाणा येथे दूषित पाण्यामुळे पुन्हा एकदा अतिसाराची साथ उद्भवली असून, सहा रुग्णांना लागण झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू ...

ठळक मुद्देवैद्यकीय पथक दाखल : पाणी नमुने तपासणीला रवाना

नाशिक : सुरगाणा येथे दूषित पाण्यामुळे पुन्हा एकदा अतिसाराची साथ उद्भवली असून, सहा रुग्णांना लागण झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. मागील वर्षी येथे अतिसाराने तिघांना जीव गमवावा लागला होता.दूषित पाण्यामुळे अतिसाराचा उद्रेक होऊन सहा जणांना लागण झाल्याने सुरगाणा तालुक्यातील ग्रामपंचायत अंबोडा, झगडेपाडा येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्या सूचनेनुसार त्वरित पाणी व स्वच्छता कक्षातील चमूने व अंबोडा प्राथमिक आरोग्य केंद्र येथील वैद्यकीय अधिकारी पथकाने भेट देऊन याबाबत माहिती घेतली.सुरगाणा तालुक्यातील झगडेपाडा येथील पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत पाण्याची पातळी खाली गेल्यामुळे पाणी दूषित होऊन अतिसाराची लागण झाली होती. याबाबत डॉ. गिते यांनी वेळीच उपाययोजना करण्याचे आदेश दिल्यानुसार पाणी व स्वच्छता कक्षातील चमूने व अंबोडा प्राथमिक आरोग्य केंद्र येथील वैद्यकीय अधिकारी पथकाने पाणी शुद्धीकरणाचा आढावा घेत सर्व संबंधित यंत्रणांनी जबाबदारीने काम करण्याबाबत सूचना दिल्या. यावेळी विहिरीची पाहणी करण्यात आली. अंबोडा येथील ग्रामीण रुग्णालय बाºहे येथे भेट दिली असता असलेले आंतररु ग्ण उपचारानंतर घरी सोडण्यात आले. सद्यस्थितीत एकही गंभीर रुग्ण नसल्याचे डॉ. गिते यांनी सांगितले.ग्रामपंचायत अंबोडा, झगडेपाडा येथील ग्रामपंचायतीतील ग्रामस्थांची बैठक घेण्यात येऊन त्यांना सद्यस्थितीत विहिरीचे पाणी पिण्यास न वापरण्याबाबत, परंतु पाड्यावरील उपलब्ध हातपंपाचे पाणी पिण्यास, वापरण्याबाबत तसेच पिण्याच्या पाण्यात जीवन ड्रॉपचा वापर करण्याबाबत तसेच पाणी उकळून व गाळून पिण्याबाबत सूचना देण्यात आल्याचे पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादिन शेळकंदे यांनी सांगितले. यावेळी विस्तार अधिकारी ग्रामपंचायत, जिल्हा पाणी गुणवत्ता निरीक्षक, वैद्यकीय अधिकारी व पथक, ग्रामविकास अधिकारी, आरोग्य सहायक, आरोग्य सेवक, उपपाणी गुणवत्ता सल्लागार, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्य