नाशिक : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने शुक्रवार, दि. ३ पासून विशेष जात पडताळणी मोहीम राबविण्यात येणार असून, यामध्ये प्रलंबित प्रकरणांचा निपटणारा प्रामुख्याने करण्यात येणार आहे.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नाशिक समितीकडून दि. ३ ते ६ तारखेच्या कालावधीत शासकीय सुटी सोडून विशेष मोहिमेद्वारे प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात येणार आहे. अर्जदारांचा प्रकरणावर समितीकडून विशेष मोहिमेद्वारे प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी कार्यालयाच्या वतीने धडक मोहीम राबविण्यात येत आहे.अर्जदारांनी आपल्या प्रकरणांवर समितीला लवकर निर्णय घेणे शक्य व्हावे, यासाठी नियम २०१२ मधील नियम क्र .१७ (२) (३) नुसार कागदोपत्री पुरावे, शपथपत्रे, इतर आवश्यक दस्तऐवज अद्याप दाखल केले नसल्यास व अर्जदाराचे ज्या प्रकरणात त्रुटी आहे, असे अर्जदारास समितीकडून त्रुटीपूर्तता करण्यासाठी त्रुटीचे पत्रे व पाठविण्यात आलेले आहेत. त्याबाबत अर्जदाराने तातडीने समितीकडे त्रुटींची पूर्तता करावी, असे आवाहन करण्यात आलेले आहे.शैक्षणकि वर्ष २०१७-१८ मध्ये इयत्ता १२वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव संबंधित महाविद्यालयामार्फत पडताळणी समिती कार्यालयात प्राप्त झालेले आहेत. मात्र ज्यांना समितीकडून त्रुटी कळविलेली आहे व पत्र पाठविण्यात आले आहे, अशा विद्यार्थ्यांनी दि. ३ ते दि.६ या कालावधीत कार्यालयात येऊन त्रुटींची पूर्तता करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
जात पडताळणी प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी विशेष मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2018 9:48 PM
नाशिक : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने शुक्रवार, दि. ३ पासून विशेष जात पडताळणी मोहीम राबविण्यात येणार असून, यामध्ये प्रलंबित प्रकरणांचा निपटणारा प्रामुख्याने करण्यात येणार आहे.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नाशिक समितीकडून दि. ३ ते ६ तारखेच्या कालावधीत शासकीय सुटी सोडून विशेष ...
ठळक मुद्देदि. ३ ते ६ तारखेच्या कालावधीत प्रलंबित प्रकरणांचा निपटारा १२वी विज्ञान विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव प्राप्त