नाशिक: जागतिक आरोग्य संघटनेच्या पाहाणीत २८ टक्के बालकांना जंतुचा धोका असल्याचा निष्कर्ष काढल्याने देशभर ‘राष्टÑीय जंंतनाशक मोहिम २००९’ राबविली जात असून नाशिक जिल्ह्यातही शिंदेगाव येथे या मोहिमेस प्रारंभ झाला. जिल्हा परिषद अध्यक्ष शितल सांगळे यांनी बालकांना जंतनाशाक गोळ्या देऊन मोहिमेला सुरूवात केली.छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय येथे या मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी सभापती यतींद्र पगार, अर्पणा खोसकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, उपसंचालक डॉ. रत्ना रावखंडे, सदस्य शंकर धनवटे, पंचायत समिती सदस्य उज्वला जाधव, संजय तुंगार, डॉ. मंगेश सोनवणे, विजय जगताप, शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय देकाटे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. दिनेश पाटील गटविकास अधिकारी पी. एस. कोल्हे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कैलास भोये इत्यादी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे म्हणाल्या, सुदृढ आणि सशक्त पीढीसाठी सदर मोहित अत्यंत महत्वाची आहे. ही योजना तीन विभाग एकत्र येऊन राबवत असून यामध्ये आरोग्य शिक्षण व महिला बालकल्याण विभागाचा संपूर्ण सहभाग असतो . गावपातळीवर आरोग्य सेवक, सेविका, आशा ,अंगणवाडी कार्यकर्ता, शिक्षक हे सुक्ष् नियोजन करून या मोहिमेला साथ देत असतात. या मोहिमेचा लाभ सर्वघटकांपर्यंत पोहचविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी सभापती अर्पणा खोसकर, यतिंद्र पगार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, संजय लाट, डॉ. रत्ना रावखंडे यांनी मार्गदर्शन केले.याप्रसंगी आरोग्य विभागातील सहा दिवसांनी निवृत्त होणाºया आरोग्य सहायक वाघ यांचा सत्कार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शितलर् सांगळे यांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन बडे यांनी केले. आभार शालिनी कदम यांनी मानले.कार्यक्र म यशस्वीतेसाठी माता बाल संगोपन अधिकारी डॉक्टर रवींद्र चौधरी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शैलेश निकम, प्राथमिक आरोग्य केंद्र शिंदे येथील डॉ. पाटील, डॉ. वळवी, डॉ. दिघे, आरोग्य सहाय्यक वडनेरे, तालुका सुपरवायझर पाटील, बडे,चाट कर यांनी विशेष प्रयत्न केले.
शिंदेगाव येथून जंतनाशक मोहिमेस प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 5:50 PM
नाशिक : जागतिक आरोग्य संघटनेच्या पाहाणीत २८ टक्के बालकांना जंतुचा धोका असल्याचा निष्कर्ष काढल्याने देशभर ‘राष्टÑीय जंंतनाशक मोहिम २००९’ ...
ठळक मुद्देजिल्हा परिषद: २७ रोजी वंचित बालकांनाही देणाऱ्या गोळ्या