लोकमत न्यूज नेटवर्कनाशिकरोड : बिटको महाविद्यालयातील वाणिज्य शाखा तृतीय वर्षाच्या बिझनेस रेग्युलेटरी फ्रेमवर्क या विषयात मोठ्या संख्येने विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले असून पुन्हा उत्तरपत्रिकेची तपासणी करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.बिटको महाविद्यालयाचे प्राचार्य धनेश कलाल यांना युवा सेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वाणिज्य शाखा तृतीय वर्ष बिझनेस रेग्युलिटी फ्रेमवर्क (एम.लॉ) या विषयात मोठ्या संख्येने विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. तसेच बॅँकींग-२, बॅकिंग-३ या विषयात देखील अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे विद्यालयातील अंतर्गत गुण याची तपासणी करण्यात यावी, बिझनेस रेग्युलिटी फ्रेमवर्क या विषयाची उत्तरपत्रिका पुन्हा तपासून नव्याने निकाल जाहीर करण्यात यावा. विद्यापीठाने विद्यार्थ्यांना रिव्हॅल्युएशन किंवा रिचेकिंगचा पर्याय देऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षाचे नुकसान करू नये अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर युवा सेनेचे अजिंक्य गायधनी, गौरव घाडगे, विशाल पाटील, प्रतिक महाले, सुशांत भडांगे, महेश देवरे, अमित इंगळे, प्रकाश कोटवार, शुभम छाजेड, कीर्ती खरे, सचिन महाजन आदिंच्या सह्या आहेत.
फेरपरीक्षा घेण्यासाठी विद्यार्थी आग्रही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 5:41 PM
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिकरोड : बिटको महाविद्यालयातील वाणिज्य शाखा तृतीय वर्षाच्या बिझनेस रेग्युलेटरी फ्रेमवर्क या विषयात मोठ्या संख्येने विद्यार्थी ...
ठळक मुद्देरेग्युलेटरी फ्रेमवर्क विषयात असंख्य विद्यार्थी अनुत्तीर्ण