नाशिकरोड : नाशिक-पुणे महामार्गावरील नेहरूनगर येथील बाळ येशू महामंदिर दिड दिवसाच्या यात्रोत्सवाची रविवारी दुपारी उत्साहात सांगता झाली. दिड दिवसाच्या यात्रोत्सवात सुमारे दीड लाखाहून अधिक भाविकांनी दर्शनासाठी व सामूहिक प्रार्थनेसाठी हजेरी लावल.नेहरूनगर येथील बाळ येशु महामंदिर दिड दिवसाच्या यात्रोत्सवास शनिवारी प्रारंभ झाला होता. देशाच्या व राज्याच्या विविध भागातून दर्शनासाठी भाविक उपस्थित होते. रविवारी पहाटे सहा वाजेपासून दुपारी बारा वाजेपर्यंत प्रत्येक तासाला इंग्रजी,मराठी, तामिळ भाषेत सामूहिक प्रार्थना घेण्यात आली. नाशिक-पुणे महामार्गावर वाहतुकीची कोंडी न होता वाहतूक सुरळीत सुरू होती. यात्रेतीे प्रथमोउपचार केंद्रात जवळपास दोनशे भाविकांवर प्राथमिक उपचार करण्यात आले. बाळ येशु मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने यात्रोत्सव काळात शंभर खाजगी सुरक्षा रक्षक व पोलीस आयुक्तालयाकडून विविध पोलिस ठाण्याचे कर्मचारी, गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. त्यामुळे चोरीच्या घटनांना आळा बसला. रविवारी दुपारी बारा वाजता सामूहिक प्रार्थना झाल्यानंतर यात्रा उत्सवाची सांगता झाली.
बाळ येशू यात्रोत्सवाचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2020 8:32 PM