नाशिक : वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने वीज वितरण यंत्रणेची झालेली हानी भरून काढण्यासाठी वीज कर्मचारी सलग पाचव्या दिवशी कामात व्यस्त होते. शहरातील इंदिरानगर भागात महापालिकेच्या हायड्रॉलिक क्रेनची मदत घेऊन वादळामुळे धोकादायक झालेल्या झाडाच्या फांद्या, वीज तारांमध्ये अडकलेले फ्लेक्सचे तुकडे, पतंगाचा मांजा हटविण्याचे काम सायंकाळपर्यंत सुरू होते. या भागात यापूर्वी वीज तारांपासून ६-७ फुटापर्यंतच्या झाडांच्या फांद्या छाटण्यात आल्या होत्या. मात्र वादळामुळे आणखी कांही फांद्या वीज तारांजवळ आल्या आहेत.चांदवड आणि नाशिक ग्रामीण विभागातील पेठ तालुक्यात पडलेले खांब बसविणे आणि वाकलेले खांब सरळ करणे, तुटलेल्या तारा जोडून घेण्याची कामे सुरु होती. शक्य असलेल्या ठिकाणी पर्यायी मार्गाने वीजपुरवठा सुरु ठेऊन दुरु स्तीची कामे करण्याचे येत आहेत.नाशिक शहर मंडळात लघुदाब वाहिनीचे ८९२ तर उच्चदाब वाहिनीचे २२७ व मालेगाव मंडळात लघुदाब वाहिनीचे ४७२ तर उच्चदाब वाहिनीचे १४४ विजेचे खांब पडले किंवा वाकले आहेत. जिल्ह्यात महावितरणच्या लघुदाब वाहिनीच्या ७० किलोमीटर आण िउच्चदाब वाहिनीच्या २० किलोमीटर वीज तारा तुटल्या आहेत. जवळपास १० रोहित्र (डीपी) खाली पडले किंवा वाकले आहेत. त्यासोबतच ७७५ रोहित्र निकामी झाले होते. वीज वितरण यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी अधिकारी, अभियंते व कर्मचारी अविरत काम करत असून नैसिर्गक आपत्ती लक्षात घेऊन सन्मानीय ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता श्री. ब्रिजपालिसंह जानवीर यांनी केले आहे.
सलग पाचव्या दिवशीही महवितरण खांबावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 7:06 PM