नाशिक : वेतनाच्या मागणीसाठी दोन वर्षांपूर्वी ऐन दिवाळीत पुकारण्यात आलेल्या संपामुळे संपूर्ण प्रवासी वाहतूक विस्कळीत होऊन प्रवाशांचे अतोनात हाल झाले होते. आता त्याचीच पुनरावृत्ती करण्याची तयारी एस.टी. कर्मचाऱ्यांनी चालविली आहे. बोनस दिला नाही तर दिवाळी, भाऊबीजला एक दिवसाची पगारी सुट्टी घेऊन कर्मचारी प्रशासनाला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे.गेल्या चार वर्षांपासून महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या वेतनकराराचा प्रश्न गाजत आहे. करारातून नेमके काय साध्य झाले आणि मुळात कर्मचाºयांना काय मिळाले याविषयीची संदिग्धता कायम आहे. वेतन कराराच्या काही मुद्द्यांवर अजूनही एकमत झालेले नसताना कर्मचाºयांनी बोनसच्या मागणीसाठी प्रशासनाला कोंडीत पकडण्याची तयारी सुरू केली आहे.एस.टी. कर्मचाºयांना तुटपुंजा पगार असताना नियमानुसार त्यांना बोनसही दिला जात नाही. दिवाळी भेट म्हणून प्रत्येक कर्मचाºयाला अडीच हजारांचे दान दिले जाते. त्यातही सातत्य नाही. सार्वजनिक सेवा देणाºया सर्व कामगार वर्गाला नियमानुसार बोनस दिला जात असताना एस.टी. कर्मचाºयांनादेखील एक महिन्याचा बोनस मिळावा यासाठी कर्मचाºयांनी सोशल मीडियावर जनजागृती सुरू केली आहे. बोनसच्या या मागणीसाठी कर्मचाºयांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. बोनस मिळणार नसेल हक्काची पगारी रजा दिवाळी आणि भाऊबीजला घेण्याचा इशारा कर्मचाºयांनी दिला आहे.
...तर दिवाळी, भाऊबीजला घेणार पगारी सुट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 7:59 PM
नाशिक : वेतनाच्या मागणीसाठी दोन वर्षांपूर्वी ऐन दिवाळीत पुकारण्यात आलेल्या संपामुळे संपूर्ण प्रवासी वाहतूक विस्कळीत होऊन प्रवाशांचे अतोनात हाल ...
ठळक मुद्दे बोनसची मागणी : एस.टी. कर्मचारी आक्रमक