ााशिक: वीजांचा कडकडाट आणि जोेरदार वाऱ्यासह कोसळलेल्या परतीच्या पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोपडून काढले. दुपारनंतर जिल्ह्यात एकुण १८.८६ मि.मी. इतकी पावसाची नोंद झाली तर या पावसामुळे काही नद्यांना पुन्हा एकदा पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले तर टोमॅटो पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविली जात आहे. शेतामध्ये साचलेल्या पाण्यामुळे देखील पीकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, शहरात अवघ्या दिड तासात ४० मि.मी. पाऊस झाला आहे. येत्या १४ तारखेपर्यंत जिल्ह्यात जोरदार पावासाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.जिल्ह्यात सर्वदूर बरसलेल्या परतीच्या पावसाने चांगलीच दाणादाण उडवून दिली. दुपारनंतर टप्याटप्पयाने बरसलेल्या पाऊसधारांनी जिल्ह्यातील अनेक भागाला झोपडपून काढले. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस हा येवला आणि बागलाण तालुक्यांमध्ये झाला सुमारे दिड ते दोन तास झालेल्या पावसामुळे शेतकºयांना पीकांची चिंता लागली आहे. येवला येथे ५९ मि.मी तर बागलाणला ४४ मिमी. पावसाची नोंद झाली. येवला तालुक्याला देखील परतीच्या पावसाने चांगलेच झोपडपून काढले असून रविवारी झालेल्या पावासाने काही ठिकाणी घरांचे छप्पर उडाले तर पीकांचे देखील नुकसान झाले आहे.
परतीच्या पावसाने जिल्ह्याला झोपडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2019 7:09 PM