ााशिक: राष्ट्रध्वजचा सन्मान राखण्याबरोबरच राष्ट्रध्वज वापराविषयी जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी पंचवटीतील उन्नती प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यानी पेठरोड येथील सिग्नलवर राष्ट्रध्वज प्रबोधन उपक्रम राबविला. राष्ट्रध्वजचा सन्मान करण्याची प्रत्येक भारतीयांची जबाबदारी असून प्लॅस्टिीक राष्ट्रध्वज न वापरण्याबाबत यावेळी विद्यार्थ्यांनी प्रबोधन केले. मुख्याध्यापक नंदलाल धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन राष्ट्रध्जाविषयी जनजागृती केली. यावेळी पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल यांनी सिग्नलवर थांबून मुलांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी हितगुजही केले.सर्वसामान्यांनी राष्ट्रध्वजचा सन्मान राखण्याच्या या मोहिमेत पोलीस आयुक्तांनीही काहीकाळ सहभाग घेतला. त्यांनी शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक करून मुलांमध्ये राष्टÑभक्ती निर्माण करण्यासाठी अशाप्रकारच्या उपक्रमांची गरज असल्याचे यावेळी सांगितले.
विद्यार्थ्यांनी केली राष्ट्रध्वज जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 6:18 PM