नाशिक : दुचाकीवर केलेली कारवाई मागे घेत नाही या कारणामुळे वाहतूक पोलिसास मारहाण करण्यात आल्याची घटना रविवारी (दि़३) दुपारच्या सुमारास शालिमार परिसरात घडली़ जगन्नाथ बारी असे मारहाण करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाºयाचे नाव आहे़भद्रकाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी एक वाजेच्या सुमारास बारी हे शालिमार परिसरात कर्तव्यावर होते़ यावेळी देवळालीगाव येथील संशयित फिरोज रमजान मणियार व सय्यद मुशिर अब्दुल चिराउद्दीन यांनी वाहतूक नियमांचा भंग केल्याने बारी यांनी त्यांच्यावर कारवाई केली़ याचा राग येऊन आमच्यावरील कारवाई मागे घ्या, असे म्हणत या दोघांनी बारी यांना मारहाण केली़या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात दोघा संशयितांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
दुचाकीचालकाकडून वाहतूक पोलिसास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2017 10:46 PM
नाशिक : दुचाकीवर केलेली कारवाई मागे घेत नाही या कारणामुळे वाहतूक पोलिसास मारहाण करण्यात आल्याची घटना रविवारी (दि़३) दुपारच्या सुमारास शालिमार परिसरात घडली़ जगन्नाथ बारी असे मारहाण करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाºयाचे नाव आहे़भद्रकाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी एक वाजेच्या सुमारास बारी हे शालिमार परिसरात कर्तव्यावर होते़ यावेळी देवळालीगाव येथील संशयित ...
ठळक मुद्देदुचाकीवर केलेली कारवाई मागे घेत नाही या कारणामुळे मारहाण दोघा संशयितांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल