नाशिक : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी जिल्हा परिषदेतून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पुणे येथील यशदामध्ये प्रशिक्षण घेण्या-या अधिका-यांना कुपोषणाबाबत प्रशिक्षण दिले. अशा प्रकारे व्हर्च्युअल क्लासरु मव्दारे प्रशिक्षण देऊन यशदामध्ये नवीन पायंडा पाडला आहे.महाराष्ट्र शासनाच्या यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) मार्फत राज्यातील विविध विभागामधील अधिकारी व कर्मचा-यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येते. सदरचे प्रशिक्षण निवासी स्वरु पात घेण्यात येते राज्यातील आरोग्य विभागातील अधिका-यांसाठी सध्या यशदामध्ये प्रशिक्षण घेण्यात येत आहे. या प्रशिक्षणासाठी कुपोषण या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांना आमंत्रित करण्यात आले होते.डॉ. गिते यांनी व्हर्च्युअल क्लासरुमव्दारा नाशिक येथूनच प्रशिक्षणार्थींना कुपोषणाबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित अधिका-यांच्या विविध प्रश्नांचे निरसन करत त्यांनी नाशिकमध्ये राबविलेल्या उपक्र मांची माहिती दिली.
कुपोषणाबाबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2019 6:55 PM