नाशिक : जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांसाठी केव्हाही निवडणुकीची घोषणा होऊ शकते, अशी शक्यता गृहीत धरून जिल्हा निवडणूक विभागाने सुरू केलेल्या निवडणुकीच्या तयारीला चांगलाच वेग आला आहे. जिल्ह्याची अंतिम मतदारयादी जाहीर करण्यात आली असून, यंत्रांच्या पडताळणी कामाला वेग आलेला आहे. जवळपास २१ हजार मतदान यंत्रांची पडताळणी पूर्ण करण्यात आलेली आहे. विशेष सुटीच्या दिवशी निवडणूक कर्मचाऱ्यांनी यंत्रे पडताळणीची कामे केली.विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने निवडणूक कामात कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी जिल्हा निवडणूक विभागाकडून विशेष काळजी घेतली आहे. रविवारी सुटीच्या दिवशीही कर्मचाऱ्यांनी निवडणूक संदर्भातील कामे केली. निवडणुकीसाठी ३ हजार ७५५ मतदान यंत्रे नाशिकसाठी प्राप्त झाली आहेत. ही यंत्रे अंबड येथील वेअरहाउसमध्ये ठेवण्यात आली असून, या ठिकाणी सदर मतदान यंत्रांची तांत्रिक तपासणी केली जात आहे. जिल्ह्यातील पंधरा मतदारसंघांसाठी होणाºया निवडणुकीच्या तयारीला चांगलाच वेग आला आहे. मतदानासाठी राज्यात मोठ्या संख्येने व्हीव्हीपॅट, कंट्रोल युनिट, ईव्हीएम ही यंत्रे लागणार आहेत. त्यासाठी निवडणूक आयोगाकडून उत्तर प्रदेश, तामिळनाडू, पुणे व बंगळुरू येथील बेल कंपनीकडून यंत्रे उपलब्ध करून दिली जात आहेत. नाशिकला बंगळुरू येथील बेल कंपनीकडून यंत्रे मिळाली आहेत.धुळे लोकसभा मतदारसंघातून १ हजार ८६८ बॅलेट युनिट, ९३४ कंट्रोल युनिट व ९३५ व्हीव्हीपॅट यंत्रे प्राप्त झाली आहेत. यापूर्वी सुमारे १० हजार मतदान यंत्रे जिल्हा निवडणूक शाखेला प्राप्त झाली आहेत. अंबड येथे सुरू असलेल्या यंत्रे पडताळणी कामालादेखील वेग आल्याने जवळपास २१,२८७ यंत्राची तपासणी करण्यात आलेली आहे. सुटीच्या दिवशी कर्मचाºयांनी निवडणुकीच्या संदर्भातील कामे केली आहेत.
२१ हजार मतदान यंत्रांची पडताळणी पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2019 5:34 PM
नाशिक : जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांसाठी केव्हाही निवडणुकीची घोषणा होऊ शकते, अशी शक्यता गृहीत धरून जिल्हा निवडणूक विभागाने सुरू ...
ठळक मुद्देनिवडणुकीची तयारी : सुटीच्या दिवशीही कर्मचारी कामावर