नाशिक : दिवसा आणि रात्रीच्या सुमारास तापमानातील बदलामुळे जिल्ह्यात स्वाइन फ्लू आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत असून, याचा सर्वाधिक धोका शहरी भागात असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय देकाटे यांनी दिली. जानेवारी ते मार्च या कालावधीत जिल्ह्यात १४७ रुग्ण आढळून आले असून, १४ जणांचा यात मृत्यू झाला आहे.वातावरणातील बदलाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याने या वातावरणातही एच वन, एन वनचे विषाणू कार्यरत होत आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत असल्याने नागरिकांनी वैयक्तिकरीत्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहनदेखील करण्यात आले आहे. या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर देकाटे यांनी सांगितले की, दिवसाचे तापमान व रात्रीच्या तापमानामध्ये कमालीची तफावत आढळून येत आहे. या परिस्थितीमध्ये एच वन, एन वन (स्वाइन फ्लू) या आजाराची रु ग्ण संख्या वाढण्याची दाट शक्यता असते.आत्तापर्यंत जिल्ह्यामध्ये ग्रामीण व शहरी भागांमधून एच वन, एन वनसदृश १४७ रु ग्ण आढळून आलेले आहेत व आजपर्यंत १४ रु ग्णांचा मृत्यू झाला आहे. सदर रु ग्णाचे प्रमाण हे शहरी भागांमध्ये जास्त आढळून येत असल्याने स्वत:ची काळजी घेणे हे खूप गरजेचे आहे. ताप, सर्दी, घसादुखी, पडसे यांसारखी लक्षणे दिसून आल्यास अंगावर न काढता डॉक्टरांकडून तपासून उपचार घेणे गरजेचे असल्याचे देकाटे यांनी सांगितले. आजारी व्यक्तीने गर्दीमध्ये मिसळू नये तसेच सर्दी-पडसेची लक्षणे आढळून आल्यास शिंकताना खोकताना रु मालाचा वापर नियमितपणे करावा तसेच आहार चांगल्या पद्धतीने घेण्यात यावा, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, आराम करावा, लहान मुलांना उबदार कपड्यांमध्ये ठेवावे त्यांना वेळीच दवाखान्यात दाखवून उपचार करून घेण्यात यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.या आजारावरील औषधे टॉमी फ्लू सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रु ग्णालय येथे उपलब्ध असून संशय वाटल्यास त्वरित संबंधित आरोग्य संस्थेमध्ये जाऊन उपचार करून घेण्यात यावे, सामाजिक समारंभ, जत्रा, शाळा, वसतिगृहे या ठिकाणी हे आजार वेगाने पसरतात त्यामुळे सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. या आजारांमध्ये ताप येणे, घसादुखी, घशाला खवखव, खोकला, नाक गळणे, अंगदुखी, डोकेदुखी, थकवा, लहान मुलांमध्ये उलटी आणि जुलाबाची लक्षणे अशी लक्षणे असल्यास त्वरित जवळच्या आरोग्य संस्थेमध्ये जाऊन उपचार करून घेण्यात यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
ुु