शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

कोमजलेला ‘बालहक्क दिन’ (विश्लेषण)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 6:54 PM

‘बालहक्क दिन’ बालकांचा हक्क आणि अधिकाराचे संरक्षण होण्यासाठी जनमानसात जनजागृती करण्याबरोबरच बालकांना मूळ प्रवाहात आणण्याची संवेदना जागरूक करण्याचा हा ...

‘बालहक्क दिन’ बालकांचा हक्क आणि अधिकाराचे संरक्षण होण्यासाठी जनमानसात जनजागृती करण्याबरोबरच बालकांना मूळ प्रवाहात आणण्याची संवेदना जागरूक करण्याचा हा दिवस. संयुक्त राष्टÑसंघाने २० नोव्हेंबर १९८९ रोजी बालहक्क संहिता स्वीकारली आणि बालकांचे हक्क तसेच सुरक्षा याविषयीची जाणीव जागृती करण्यासाठी १९० देशांनी बालकांचे हक्क मंजूर करण्याच्या मसुद्याला मान्यता दिली. २० नोव्हेंबर उलटून दोन दिवस झाले आहेत. समाज आणि प्रशासन अशा दोन्ही पातळ्यांवर शहरात मात्र बालहक्कांच्या कार्यक्रमांची कुठेही जाणीव जागृत होताना दिसली नाही. खरेतर १४ ते २० नोव्हेंबर या कालावधीत बालहक्कासाठी सप्ताहाच साजरा करण्याचे संयुक्त राष्टÑसंघाचे संकेत आहेत. परंतु बालहक्काविषयी कुणाला काहीहीएक देणे-घेणे नसावे असेच शहरातील वातावरण राहिले. बालकांच्या त्यांच्या हक्कांपर्यंत पोहोचविण्यासाठीचा कोणताही प्रशासकीय आणि सामाजिक कार्यक्रम शहरात होऊ शकला नाही. शहराच्या कानाकोपऱ्यास एखादा कार्यक्रम झाला असेल त्याचेही समर्थन करता येणारे नाही. जागृती कार्यक्रम हे कोणत्या कोनाड्यात घेऊन उपयोगाचे होणार नाही याचीदेखील संबंधितांना समज द्यावी लागणार असेल तर बालकांना हक्क प्रदान करण्याच्या प्रवाहात असा छोटा विचार कितपत टिकणार हाही मुद्दा दुर्लक्षित करून चालणार नाही. खरेतर बाल हक्काच्या दिवशी तरी निदान झोपडपट्टी, सिग्नलवरील मुलांच्या हक्काची चर्चा होईल, असे वाटले होते. परंतु शहरात असा कुठलाच सोहळा होताना दिसला नाही.बालहक्क दिनानिमित्ताने दफ्तरविना शाळा, बालसभा, हक्क आणि अधिकाराचे मार्गदर्शन, आनंददायी खेळ, छंद स्पर्धा, शाळा परिसरातील धोक्याच्या जागा दूर करणे, शाळा व्यवस्थापन समितीची सभा, मुलांच्या हक्क आणि संरक्षणावर चर्चा, बाल हक्काबाबतच्या स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा , पोस्टर बनविणे, चित्र काढणे असे विविध उपक्रम राबविणे अपेक्षित आहे किंबहूना १४ ते २० नोव्हेंबर या सप्ताहात असे उपक्रम घ्यावेत असे संयुक्त राष्टÑसंघाचे निर्देश आहेत. मात्र एकूणच संवेदना हरविलेले समाजमन आणि प्रशासकीय उदासीनता यात ‘बालहक्कदिन‘ कोमजून गेला असेच म्हणावे लागेल.खरेतर बालहक्काच्या मुद्दाला मान्यता देताना बालहक्काच्या जाणिवांची मोठी यादी अनेक देशांनी मान्य केलेली आहे. परंतु यंत्रणाच उदासीन असेल तर बालहक्काची जनजागृती होणारच नाही. असेच काहीसे शहरात घडले. शहरात कुठेही मुलांचे आरोग्य, शिक्षण, पोषण आहार, याविषयीचे कार्यक्रम, बालविवाह, बालमजूर, लैंगिक शोषणाविरुद्धचा आवाज उठला नाही. अन्य दिवशी बालकांच्या हक्काची पायमल्ली होत असतेच ‘बालहक्क दिनी’देखील तेच घडून गेले. बालकेहक्कापासून दुर्लक्षितच राहिली.

टॅग्स :Nashikनाशिकchildren's dayबालदिन