शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
6
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
7
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
8
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
9
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
10
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
12
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
14
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
15
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
16
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
17
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
18
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
19
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
20
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा

नाशिक, नगरला टॅँकरद्वारे पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2019 2:05 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिकरोड : उन्हाचा चटका दिवसेंदिवस वाढू लागला असून पाण्याची टंचाई देखील मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्याने नाशिक ...

ठळक मुद्देजळगावात २१० विहरी अधिगृहितधुळ्यात १८ गावांमध्ये टॅँकर

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिकरोड : उन्हाचा चटका दिवसेंदिवस वाढू लागला असून पाण्याची टंचाई देखील मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्याने नाशिक विभागातील ३७६ गावे, २९९६ वाड्यातील १७ लाख लोकांसाठी ९६५ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच पाण्याची गरज भागविण्यासाठी ३८५ गावातील विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. विभागात सर्वाधिक जास्त नगर जिल्ह्यात व त्या खालोखाल नाशिक जिल्ह्यात टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून नंदुरबार जिल्ह्याला अजूनपर्यंत टॅँकरची गरज भासलेली नाही.यंदाच्या वर्षी सरासरी पेक्षा पाऊस कमी झाल्याने राज्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून गावखेड्यांना पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे. पाण्याची गरज भागविण्यासाठी विभागात आत्तापासून टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत असून नगर जिल्ह्याला दुष्काळाची सर्वाधिक झळ बसलेली आहे.उन्हाळा सुरू होऊन दोन महिनेच झाले असून अजून एप्रिल, मे महिना बाकी आहे. नाशिक विभागातील अनेक गावे व वाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा तुटवडा निर्माण झाल्याने टॅँकरद्वारे व विहिरी अधिग्रहण करून पाण्याची तहान भागविली जात आहे.नाशिक जिल्ह्यातील १६४ गावे, ४९७ वाड्यांमध्ये १८४ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच ४१ गावातील विहीरी देखील अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. तर टॅँकरमध्ये पाणी भरण्यासाठी ३९ विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या असून ४ लाख ३ हजार नागरिकांना पाणी उपलब्ध करून दिले जात आहे.धुळे जिल्ह्यातील १८ गावांत १५ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून ८० गावांसाठी विहीरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. तर टॅँकरसाठी १५ विहीर अधिग्रहण करण्यात आले असून ४३ हजार लोकसंख्येला पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. विशेष म्हणजे नंदुरबार जिल्ह्यात अद्यापपर्यंत टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची व विहीर अधिग्रहण करण्याची गरज भासलेली नाही.जळगांव जिल्ह्यातील ११० गावांमध्ये ९१ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून २१० गावांतील विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. तर टॅँकरसाठी ३ विहीर अधिग्रहीत करण्यात आल्या असून २ लाख २६ हजार लोकांना पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. तर अहमदनगर जिल्ह्यातील ४४४ गावे २ हजार ४९९ वाड्यांमध्ये ६७५ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ५४ गावांसाठी विहीरी अधिग्रहीत करण्यात आल्या असून टॅँकरकरिता ४० विहीर अधिग्रहीत केल्या आहेत. नाशिक विभागात पाण्याची गरज भागविण्यासाठी ७३६ गावे, २९९६ वाड्यांमध्ये ९६५ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ३८५ गावासाठी विहीर व ९७ विहिरी टॅँकरमध्ये पाणी भरण्यासाठी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. विभागातील १७ लाख लोकांसाठी याद्वारे पाणी उपलब्ध करून दिले जात आहे.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी