शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राजकीय घडामोडींना वेग !महायुतीतील बड्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार;शिंदे दिल्लीला जाणार
2
पाकिस्तानात जोरदार संघर्ष, ७ दिवसांत १०० मृत्यू; कुर्रम जिल्ह्यात हिंसाचार पेटला
3
महाराष्ट्रात धक्कातंत्र? मुख्यमंत्री भाजपचाच होणार, पण नक्की कोणाला संधी?; पक्षातील ५ नावं स्पर्धेत
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
5
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
6
Stock Market Updates: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये तेजी; ऑटो शेअर्सवर दबाव
7
महायुतीच्या नव्या सरकारमध्ये गृहमंत्री कोण असेल? अजित पवार, एकनाथ शिंदे की....  
8
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
9
देशातील नंबर १ रेस्तराँ कोणतं? Anand  Mahindra यांचीही आहे गुंतवणूक; या यादीत घातलाय धुमाकूळ
10
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
11
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
12
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
13
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
14
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
15
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
16
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
17
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
18
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
19
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
20
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

नाशिकला विवाह समारंभातून वधूच्या सव्वापाच लाखांच्या दागिन्यांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2018 3:35 PM

नाशिक : विवाह समारंभातून वधूचे सव्वापाच लाख रुपये किमतीचे २७ तोळे वजनाचे दागिने चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना गंगापूर रोडवरील लक्ष्मीनारायण बँक्वेट हॉलमध्ये सोमवारी (दि़५) दुपारी घडली़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

ठळक मुद्देगंगापूर रोड : २७ तोळ्याचे दागिनेपोलिसांत गुन्हा दाखल

नाशिक : विवाह समारंभातून वधूचे सव्वापाच लाख रुपये किमतीचे २७ तोळे वजनाचे दागिने चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना गंगापूर रोडवरील लक्ष्मीनारायण बँक्वेट हॉलमध्ये सोमवारी (दि़५) दुपारी घडली़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात प्रियंका प्रशांत शहाणे (रा़९०६, सोनार बिल्डिंग, वडनेर रोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची मोठी मुलगी स्रेहल हिचा विवाह टागोरनगरमधील भूषण कुलथे यांच्यासोबत सोमवारी(दि़५) गंगापूर रोडवरील लक्ष्मीनारायण बँक्वेट हॉलमध्ये झाला़ शहाणे तसेच वरपक्षाकडील कुलथे यांनी वधुसाठी बनविलेले सोन्याचे दागिणे विवाहाप्रसंगी घालावयाचे होते़ सकाळी आठ वाजता मंगल कार्यालयात वधू व वरपक्षासह वºहाडी मंडळीही आली होती़ वधूसाठी देण्यात आलेल्या कक्षामध्ये कपडे, भेटवस्तू, बॅग तसेच सोन्याचे दागिने असलेली काळ्या रंगाची पर्स आदी सामान ठेवण्यात आले होते़

हळदी समारंभ दुपारी आटोपल्यानंतर दागिण्यांची पर्स शहाणे यांनी आपली आई भागिरथी नागरे यांच्याकडे दिली होती़ सायंकाळी पाच वाजता वधूला दागिने हवे असल्याने त्यांनी आईकडे पर्स मागीतली असता त्यांच्या मोलकरणीने पर्स रुममधील बेडवर असल्याचे सांगितले़प्रियंका शहाणे यांनी रुममध्ये जाऊन पर्सची तपासणी केली असता त्यामधील दागिण्यांची चोरी झाल्याचे आढळून आले़

या पर्समध्ये ६४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे नेकलेस, १० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या रिंगा, ७ ग्रॅमची बिंदी, १२ ग्रॅमचे सोन्याचे बाजुबंद, ६१ ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस, ११६ ग्रॅम वजनाचा सोन्याचा चपलाहार असे ५ लाख २७ हजार रुपये किमतीचे २७ तोळ्याचे दागिने होते़ दागिने चोरीला गेल्याची माहिती त्यांनी पतीला सांगताच त्यांनी गंगापूर पोलीस ठाण्यास माहिती दिली़

टॅग्स :NashikनाशिकGoldसोनंtheftचोरीPoliceपोलिसCrimeगुन्हा