शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

स्टेट बँकेतून महिलेची २५ हजारांची रोकड लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2018 4:31 PM

नाशिक : स्टेट बँक आॅफ इंडियाच्या सीबीएस येथील शाखेत पैसे भरण्यासाठी गेलेल्या महिलेच्या पर्ससह पंचवीस हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना मंगळवारी (दि़ ७) दुपारच्या सुमारास घडली़

ठळक मुद्देसीबीएसच्या मुख्य शाखेत घटना ; चोरीचा गुन्हा दाखल

नाशिक : स्टेट बँक आॅफ इंडियाच्या सीबीएस येथील शाखेत पैसे भरण्यासाठी गेलेल्या महिलेच्या पर्ससह पंचवीस हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना मंगळवारी (दि़ ७) दुपारच्या सुमारास घडली़

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पालघर जिल्ह्याच्या तलासरी तालुक्यातील उदवा येथील रहिवासी निर्मला सांबरे या मंगळवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पैसे भरण्यासाठी सीबीएसच्या मुख्य शाखेत गेल्या होत्या़ याठिकाणी चोरट्यांनी त्यांची काळ्या रंगाची पर्स चोरून नेली़ या पर्समध्ये २५ हजार रुपयांची रोकड होती़

या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़घरफोडीत दागिन्यांची चोरीनाशिक : बंद घराचा दरवाजा तोडून घरातील सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम व गृहोपयोगी वस्तू चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना गंगापूररोडवरील भोसला मिलिटरी स्कूलच्या मागे असलेल्या संत कबीरनगर झोपडपट्टीत घडली़ १७ जुलै ते ७ आॅगस्ट या कालावधीत चोरट्यांनी कबीरनगरमधील उषा खरात यांच्या घराचा दरवाजा तोडून घरातील २० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन, २० हजार रुपयांची रोकड, दहा हजार रुपयांचा एलसीडी, दोन हजार रुपयांची गॅस टाकी व शैक्षणिक कागदपत्रांची फाईल असा ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेस मारहाणनाशिक : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीस मारहाण करून चाकूने वार केल्याची घटना जुन्या नाशिकमधील कुंभारवाडा परिसरात मंगळवारी (दि़ ७) सायंकाळच्या सुमारास घडली़ स्मिता चव्हाण या विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास पती राकेश गणपत चव्हाण याने चारित्र्याच्या संशयावरून काठीने मारहाण केली़ तसेच चाकूने हातावर वार केले़ या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़उपनगरला महिलेची आत्महत्यानाशिक : बेडरूममधील खिडकीच्या गजाला ओढणीने गळफास घेऊन चाळीस वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि़ ७) नाशिकरोडच्या कॅनॉल रोडवरील गुरुदत्त कॉलनीत घडली़ सुनीता मंगलराव शेट्टी (रा. कृष्णवेणी बंगला) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले नसून या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़नायगाव रोडवरून दुचाकीची चोरीनाशिक : शिंदे गावाजवळील नायगाव रोड परिसरातील रहिवासी कृष्णा प्रसाद राजाराम सिंग यांची २५ हजार रुपये किमतीची बजाज पल्सर दुचाकी (एमएच १५ जीसी १८७७) चोरट्यांनी नायगाव रोडवरून चोरून नेली़ या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :NashikनाशिकbankबँकtheftचोरीPoliceपोलिस