नाशिक : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी आणि कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषि विज्ञान केंद्रात गुरूवार दि. ७ रोजी सकाळी ९.३० वाजता एक दिवसीय विभागीय कृषि संशोधन व विस्तार सल्लागार समितीची खरीप पिकांच्या नियोजनाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राच्या सभागृहात होणाऱ्या या आढावा बैठकीस राज्याचे कृषी आयुक्त सचिंद्र प्रतापिसंग आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होणार आहे. अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा राहाणार आहेत.कृषि विद्यापीठाने विकिसत केलेले आणि शिफारस केलेल्या तंत्रज्ञानाविषयी या बैठकीत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कृषि विभागामार्फत कृषी विस्तार कार्य करताना आवश्यक असलेले तंत्रज्ञान आणि माहितीही या बैठकीत कृषी शास्त्रज्ञांमार्फत दिली जाणार आहे. दैनंदिन कृषी विस्तारात येणाऱ्या तंत्रज्ञानासंबंधी अडचणींवर या बैठकीत उहापोह करून उपाययोजना सुचिवल्या जाणार आहेत. विस्तारासाठी लागणाºया तांत्रिक निविष्ठांचे नियोजन या बैठकीत केले जाणार आहे. याशिवाय गत वर्षाचा पीक उत्पादनाचा आढावा येत्या खरीपाचे नियोजन यानिमित्ताने करण्यात येणार आहे. संशोधन आणि विस्तार यांच्यात सांगड घालून प्रभावीपणे प्रगत तंत्रज्ञान शेतकºयांमार्फत पोहचिवण्याचा या बैठकीचा प्रमुख उद्देश आहे.महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, विस्तार शिक्षण संचालक डॉ. किरण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली या बैठकीचे आयोजन होत आहे. या बैठकीसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील दहा जिल्ह्यांमधील कृषी संशोधन केंद्रे, कृषी विज्ञान केंद्रे, विद्यापीठातील शास्त्रज्ञ आणि कृषी विभागातील अधिकारी या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत.
मुक्त विद्यापीठात विभागीय खरीप हंगाम नियोजन बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2018 3:59 PM
नाशिक : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी आणि कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषि विज्ञान केंद्रात गुरूवार दि. ७ रोजी सकाळी ९.३० वाजता एक दिवसीय विभागीय कृषि संशोधन व विस्तार सल्लागार समितीची खरीप पिकांच्या नियोजनाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राच्या ...
ठळक मुद्देप्रगत तंत्रज्ञान शेतकऱ्यामार्फत पोहचिवण्याचा उद्देश दहा जिल्ह्यांमधील कृषी शास्त्रज्ञ उपस्थितीत राहणार