नाशिक : उसनवार घेतलेल्या पैशासाठी सुरू असलेला तगादा व अपमानास्पद वागणूक यापासून सुटका होण्यासाठी घराचे कागदपत्र दिल्यानंतर सुरू असलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे त्रस्त झालेल्या इसमाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे़पंचवटीतील हिरावाडी येथील रहिवासी भूषण गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा भाऊ रोशन गायकवाड याने संशयित गोकुळ हरिभाऊ गिते (रा़ गणेशवाडी, गिते मार्ग पंचवटी) यांच्याकडून उसनवार पैसे घेतले होते़ आॅक्टोबर २०१७ ते १२ जानेवारी २०१८ या कालावधीत संशयित गिते हे उसनवार पैशांबाबत सारखा तगादा लावून लोकांसमोर अपमानीत करून त्रास देत होता़ या त्रासातून सुटका करण्यासाठी मयत रोशन गायकवाड याने आपल्या पंचवटीतील गणेशवाडीत असलेल्या घराची कागदपत्रेही गिते यांना दिली होती़ मात्र तरीही गिते यांचा पैशांसाठी तगादा व लोकांसमोर अपमानीत करणे सुरूच होते़ अखेर या त्रासास कंटाळून रोशनने आत्महत्या केल्याचे व त्यास गिते हे कारणीभूत असल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे़या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात संशयित गोकुळ गिते विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे़
नाशकात उसनवार पैशाच्या अपमानातून तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 5:49 PM
नाशिक : उसनवार घेतलेल्या पैशासाठी सुरू असलेला तगादा व अपमानास्पद वागणूक यापासून सुटका होण्यासाठी घराचे कागदपत्र दिल्यानंतर सुरू असलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे त्रस्त झालेल्या इसमाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे़
ठळक मुद्देदेवळाली कॅम्प पोलीस ठाणे : अपमानास्पद वागणूक