नाशिक : जिल्हा परिषदेची सूत्रे हाती घेतल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांनी अधिकारी, खातेप्रमुखांना कामाची दिशा दाखविण्यासाठी सलग दोन दिवस बैठका घेतल्या तर एक दिवस संपूर्ण जिल्हा परिषद इमारतीच्या स्वच्छतेची पाहणी केली. येथील वातावरण आणि कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल करण्यासाठी गिते यांनी कामकाजाला प्राधान्य दिल्यानंतर आता त्यांनी कर्मऱ्यानादेखील प्रशिक्षण देत त्यांचा वर्ग घेतला.जिल्हा परिषदेच्या विविध योजना आणि माहितीचे परिपूर्ण संकलन व्हावे, सर्व विभाग तसेच योजनांच्या प्रगतीचे मूल्यांकन व्हावे यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गिते यांच्या संकल्पनेतून कर्मचाऱ्याचे प्रशिक्षण पार पडले. जिल्हा परिषदेचे कर्मचारीदेखील कामकाजाचा भाग असल्याने त्यांना येथील कामकाजाची माहिती असणे अपेक्षित आहे. अनेकदा माहितीच्या अभावामुळे जिल्हा परिषदेत येणाऱ्याना चुकीची माहिती मिळते आणि त्यांची परवड होते. यामुळे प्रत्येक कर्मचारी हा सजग असला पाहिजे यासाठी गिते यांनी संबंधित कर्मचाऱ्याना एक दिवसाचे प्रशिक्षण दिले.जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात कनिष्ठ सहायक, वरिष्ठ सहायक, डाटा एन्ट्री आॅपरेटर यांना गुणांक व मूल्यांकन याबाबत जिल्हा परिषद औरंगाबाद येथील शिक्षक नामदेव हिलाला यांनी प्रात्यक्षिकांस मार्गदर्शन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी गिते यांनीही कर्मचाºयांना मार्गदर्शन केले.जिल्हा परिषदेमार्फत विविध विकासकामे केली जातात. तसेच शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, पशु वैद्यकीय दवाखाने, ग्रामपंचायत यांच्या मार्फत विविध प्रकारच्या सेवा पुरविण्यात येतात. त्याचप्रमाणे विविध योजना, अभियान राबविले जाते. मात्र या कामांचे तालुकानिहाय नियमित व विहित प्रपत्रानुसार मूल्यांकन केले जात नाही. परिणामी कोणत्या बाबतीत कोणता तालुका किंवा विभाग मागे आहे हे समजून येत नाही. यासाठी संगणकार माहिती संकलनासाठी प्रपत्र तयार करून त्यानुसार दरमहा आढावा घेण्याचा गिते यांचा विचार आहे. त्यानुसार त्यांनी कामकाजाला सुरुवात केलेली आहे.
नाशिक जिल्हा परिषदेत भरला मुख्य कार्यकारी अधिकारी ‘गिते मास्तरांचा’ वर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 9:56 PM
नाशिक : जिल्हा परिषदेची सूत्रे हाती घेतल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांनी अधिकारी, खातेप्रमुखांना कामाची दिशा दाखविण्यासाठी सलग दोन दिवस बैठका घेतल्या तर एक दिवस संपूर्ण जिल्हा परिषद इमारतीच्या स्वच्छतेची पाहणी केली.
ठळक मुद्दे गिते यांच्या संकल्पनेतून कर्मचाऱ्याचे प्रशिक्षणसंगणकार माहिती संकलनासाठी प्रपत्र तयार