नाशिक : रस्त्यावरील व रस्त्यालगत असलेले असे धार्मिक स्थळे की ज्यामुळे वाहतूकीला व रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. ती धार्मिक स्थळे उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये तोडण्याची मोहिम महापालिकेच्या वतीने शहरात हाती घेण्यात आली आहे. या धार्मिक स्थळांच्या सर्वेक्षणावर धार्मिक संघटनांनी आक्षेप घेऊन ‘नाशिक बंद’ची हाक दिली आहे. या बंदला संमिश्र स्वरुपाचा अत्यल्प प्रतिसाद दिसून येत आहे. सकाळपासूनच मुळ गावठाण असलेल्या जुने नाशिकमधील दूध बाजार, फाळके रोड, भद्रकाली, मेनरोडचा काही भाग, शालिमार आदि परिसरातील व्यावसायिकांनी या बंदमध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन आपल्या दुकानांचे शटर खुले केले नाही; मात्र काही व्यावसायिकांनी नियमीतपणे व्यवसाय सुरू ठेवणे पसंत केले. महापालिकेने जुने नाशिक, वडाळारोडवरील हिरवेनगर या भागातील रस्त्यांमध्ये अडथळा ठरणारे धार्मिक स्थळांवर बुलडोझर फिरविला. यावेळी काही नागरिकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना समज दिली. दरम्यान, मंगळवारी मठ-मंदिर बचाव समितीने पत्रकार परिषद घेऊन नाशिक बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला काही नागरिकांनी प्रतिसाद दिला; मात्र बहुतांश परिसरातील दुकने सुरूच असल्याचे चित्र पहावयास मिळाले. जुन्या नाशिकमधील काही परिसर वगळता बंदला अन्य भागातून प्रतिसाद मिळू शकला नाही. महापालिकेने अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याच्या मोहिम दुसºया टप्प्यात सुरू केली आहे. या मोहिमेला पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त पुरविला आहे.
तीर्थक्षेत्र ‘नाशिक बंद’ला अत्यल्प प्रतिसाद; जुन्या नाशकात व्यावसायिकांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 1:48 PM
मंगळवारी मठ-मंदिर बचाव समितीने पत्रकार परिषद घेऊन नाशिक बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला काही नागरिकांनी प्रतिसाद दिला.
ठळक मुद्देमोहिमेला पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्तबंदला संमिश्र स्वरुपाचा अत्यल्प प्रतिसाद काही व्यावसायिकांनी नियमीतपणे व्यवसाय सुरू ठेवणे पसंत केले