नाशिक : मंगळवारी दिवसभर पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे दोन दिवसानंतर नाशिककरांना सुर्यदर्शन घडले आणि दिलासा मिळाला खरा मात्र आज पहाटेपासून शहरात पावसाची रिपरिप, ढगाळ हवामान, थंड वारा असे वातावरण निर्माण झाले आहे. लहरी निसर्गाने अचानकपणे आपले रुप बदलल्यामुळे वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे नाशिककर पावसाळयात रेनकोटसोबत चक्क स्वेटरचाही वापर उब मिळविण्यासाठी करताना दिसून येत आहे. चाकरमान्यांनी हाफ स्वेटर परिधान करुन कार्यालयात कामकाज सुरू केले. एकूणच जेष्ठांसोबत महिला, तरुण-तरुणी देखील स्वेटर, शॉल यासारख्या उबदार कपड्यांचा वापर घरात, कार्यालयात करत आहे. वातावरणात निर्माण झालेला गारवा आणि वाढलेला वाºयाचा वेग यामुळे थंडी जाणवत आहे. सकाळपासून अद्याप सुर्यप्रकाश प्रखरपणे नाही.
पावसाळ्यात नाशिककर वापरताहेत चक्क स्वेटर ! वातावरणात कमालीचा गारवा; अन् थंड वारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 1:28 PM
आज पहाटेपासून शहरात पावसाची रिपरिप, ढगाळ हवामान, थंड वारा असे वातावरण निर्माण झाले आहे
ठळक मुद्दे वातावरणात निर्माण झालेला गारवा आणि वाढलेला वाºयाचा वेग सकाळपासून अद्याप सुर्यप्रकाश प्रखर नाही. ढगाळ हवामान, थंड वारा असे वातावरण निर्माण झाले