शहरं
Join us  
Trending Stories
1
नव्या सरकारमध्ये श्रीकांत शिंदे होणार उपमुख्यमंत्री?; प्रस्तावावर भाजपाही सकारात्मक
2
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
3
माउलींनी संजीवन समाधी घेतली तेव्हा विठ्ठल रखुमाईलाही अश्रु अनावर झाले, तो आजचाच दिवस!
4
"तू जितका शिकून आलास..."; पत्नीच्या उपचारासाठी आलेले IPS डॉक्टरवर संतापले, दिली धमकी
5
Maharashtra Politics : राजकीय घडामोडींना वेग !महायुतीतील बड्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार;शिंदे दिल्लीला जाणार
6
बावीस वर्षांचे कोवळे वय, तरी इहलोकीचे अवतार कार्य संपवून माउलींनी परलोकीची धरली वाट!
7
"तिने याआधीही ४-५ वेळा...", जिया खान आत्महत्या प्रकरणावर सूरज पांचोलीच्या आईची प्रतिक्रिया
8
पाकिस्तानात जोरदार संघर्ष, ७ दिवसांत १०० मृत्यू; कुर्रम जिल्ह्यात हिंसाचार पेटला
9
महाराष्ट्रात धक्कातंत्र? मुख्यमंत्री भाजपचाच होणार, पण नक्की कोणाला संधी?; पक्षातील ५ नावं स्पर्धेत
10
Cheetah Kuno: कुनोतून आली वाईट बातमी! चित्त्याच्या दोन पिलांचा मृत्यू, मृतदेहांवर जखमा 
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
12
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
13
Stock Market Updates: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये तेजी; ऑटो शेअर्सवर दबाव
14
महायुतीच्या नव्या सरकारमध्ये गृहमंत्री कोण असेल? अजित पवार, एकनाथ शिंदे की....  
15
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
16
देशातील नंबर १ रेस्तराँ कोणतं? Anand  Mahindra यांचीही आहे गुंतवणूक; या यादीत घातलाय धुमाकूळ
17
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
18
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
19
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
20
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट

उंच झेपावणाऱ्या पतंगांना नाशिककरांनी दिला ढिल

By admin | Published: January 15, 2017 1:13 AM

पतंगोत्सव : संगीत साथीने तरुणाईने लुटली मौज

नाशिक : शहरातील लहान-थोरांसह बहुतेक नाशिककरांनी मकरसंक्रांतीचा सण साजरा करण्यास प्राधान्य देत घातक नायलॉनच्या मांजाचा वापर टाळून संक्रांत गोड करण्याचा प्रयत्न केला. अपवाद वगळता बहुतेक सर्व नाशिककरांनी नायलॉन मांजाऐवजी साधा मांजा वापरून आकाशात उंच उंच झेपावणाऱ्या विविध रंगांच्या पतंगांना ढिल देत विविध प्रकारच्या संगीताच्या साथीने पतंगबाजीचा आनंद लुटला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा शहरात थंडीचा कडाका असतानाही अनेकांनी सूर्योदयापासूनच पतंगबाजीला सुरुवात केल्याचे दिसून आले. पतंगबाजांनी सकाळपासूनच पतंग उडविण्यासाठी मोकळी मैदाने, इमारतीची गच्ची आदि खुल्या जागांवर तळ ठोकला होता. मकरसंक्र ांतीचा सूर्य डोक्यावर येत असताना नाशिककरांच्या पतंगबाजीलाही उधाण आल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी लोकांनी छतावर एकत्र जमून डीजेच्या तालावर पतंग उडविले. चव्हाटा, जुने नाशिक, गोदाघाट, पंचवटी, रामवाडी या ठिकाणी पतंग उडविताना नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला. अनेकांनी तपोवन, डोंगरे वसतिगृह मैदान यांसारख्या खुल्या जागी जाऊन पतंग उडविण्याची मौज लुटली. दुसरीकडे नायलॉन मांजामुळे आणि पतंग उडविताना अपघात होऊ नये म्हणून पोलीस शहरातील ठिकठिकाणी बारीक नजर ठेवून होते. परंतु नागरिकांमध्ये विविध माध्यमातून नायलॉन मांजाविरोधात करण्यात आलेल्या जनजागृतीमुळे शहरात अनेकांनी साध्या मांजानेच पतंग उडविणे पसंत केले. गेल्या काही दिवसांत नायलॉन मांजामुळे काही भागात एकामागून एक अपघात घडले असतानाही वेगवेगळ्या पतंग व्यावसायिकांकडून विक्री सुरूच होती. परंतु, मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कारवाई करून नायलॉन मांजा विक्रेत्यांवर जरब बसविण्यात यश मिळविल्याचे पहावयास मिळाले. मकरसंक्र ांती सणाचा पतंग हा महत्त्वाचा भाग असून, लहान मुले अधिक रस घेत असताना पालकांनी त्यांच्या सुरक्षिततेलाही सर्वाधिक प्राधान्य दिल्याचे दिसून आले. जाणते नाशिककर तथा पालकवर्ग यांनी जिवघेण्या रसायनांनी बनलेला मांजा खरेदी करणेच टाळले. (प्रतिनिधी)