एकूणच उत्तर भारतात आलेल्या शीतललहरींमुळे नाशिकच्या वातावरणावरही त्याचा प्रभाव मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे.
नाशिक : शहराच्या किमान तापमानामध्ये सातत्याने घट होत असून, बुधवारी (दि.२७) पारा थेट ८.२ अंशावर घसरला. मागील चार ते पाच दिवसांपासून सातत्याने घसरणाºया पाºयामुळे थंडीचा कडाका वाढला असून, नाशिककर गारठले आहेत. बुधवारी हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद हवामान निरीक्षण केंद्राकडून करण्यात आली.शहराचे किमान तापमान सलग पाच दिवसांपासून दहा अंशाच्या खाली राहत आहे. यामुळे थंडीचा कडाका वाढला असून, हवेत कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. बुधवारी थंडीची तीव्रता अधिक वाढल्याने नाशिककरांना हुडहुडी भरली होती. संध्याकाळी साडेसात वाजेपासून रस्ते निर्मनुष्य होण्यास सुरुवात झाली होती.थंडीचा कडाका वाढू लागल्याने रात्री ८ वाजेनंतर शहरातील बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पसरला होता. रस्ते सामसुम झाल्याचे चित्र दिसत होते.राज्यात सर्वाधिक थंडीचा कडाका मागील दोन दिवसांपासून नाशिकमध्ये जाणवत होता. मंगळवारपासून गोंदियामध्ये नीचांकी तापमानाची नोंद होत असली तरी नाशिक आणि गोंदिया या दोन्ही शहरांमधील किमान तापमानामध्ये फारसा फरक नाही. दोन्ही शहरांमध्ये थंडीचा कडाका अधिक असून, बुधवारी गोंदियाचे तापमान ८.१ अंश इतके नोंदविले गेले. सर्वाधिक थंडीचा तडाखा नागपूरला बसत असून ७.८ इतके किमान तापमान नागपूरला नोंदविले गेले.एकूणच विदर्भानंतर उत्तर महाराष्टÑात नाशकात कडाक्याची थंडी जाणवत आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुका सर्वाधिक गारठला आहे. सोमवारपासून शहराच्या किमान तापमानाचा पारा सातत्याने दहा अंशाच्या खाली राहत असून, शहरात थंडीचा कडाका वाढत असल्याने नाशिककर गारठले आहेत. हंगामात ८.२ हे सर्वाधिक नीचांकी किमान तापमान नोंदविले गेले.