सिन्नर : राज्याचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी शिक्षण विभागाने पिहल्या टप्प्यात १०० शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बनविण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाशी संलग्न असणाऱ्या अशा जिल्हा परिषद व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये अध्यापनाचे कार्य करण्यासाठी दर्जेदार आणि हुशार शिक्षकांची नियुक्ती करण्यासाठी दुसरी निवड परिषद २४ व २५ मे रोजी पुणे येथे होत आहे. आंतरराष्टÑीय दर्जाच्या शाळांसाठी नाशिकच्या ३९ शिक्षकांची नोंदणी करण्यात आली आहे.राज्यातील ३७२ तर एकट्या नाशिक जिल्ह्यातील ३९ शिक्षकांनी निवड परिषदेसाठी सहभाग नोंदविला आहे. दरम्यान, निवड परिषदेत सहभागी झालेल्या शिक्षकांमधून निवडल्या जाणाºया शिक्षकांची यादी २८ मे रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्तम शिक्षण मिळावे, यासाठी राज्यात महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. शैक्षणकि वर्ष २०१८-१९ व शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची अस्थायी संलग्नता देण्यात आलेल्या अकोला, अहमदनगर, उस्मानाबाद, औरंगाबाद, कोल्हापूर, गोंदिया, चंद्रपुर, नांदेड, नाशिक, परभणी, पुणे, बुलढाणा, रत्नागिरी, लातूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांमधील जिल्हा परिषद व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये काम करण्यासाठी दुर्दम्य इच्छाशक्ती असणारे, अध्यापनासाठी अधिक वेळ देऊ इच्छिणारे, निवड परिषदेस सामोरे जाण्याचे व उन्हाळी सुट्टीत ७ दिवसांचे निवासी प्रशिक्षण घेण्याची तयारी असणाºया संबंधित जिल्ह्यातील, जिल्हा परिषद व्यवस्थापनाच्याच शाळांमध्ये कार्यरत असणाºया शिक्षकांकडून दि. १९ ते दि. २० मे पर्यत आॅनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते.
आंतरराष्टÑीय दर्जाच्या शाळांसाठी नाशिकच्या ३९ शिक्षकांची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 5:07 PM