लोकमत न्यूज नेटवर्कसातपूर: सुवर्ण त्रिकोणातील नाशिक शहराला नव्या उद्योगातून झळाळी मिळावी यासाठी उद्योजकांच्या पुढाकाराने मंगळवारपासून दोन दिवस मुंबई येथे नाशिकच्या सुविधा आणि वैशिष्ट्यांचे ब्रॅँडिंग करण्यात येणार आहे. निमा, राज्यशासनाचा उद्योग विभाग आणि अन्य सहकारी संस्थांच्या वतीने आयोजित ‘मेक इन नाशिक’ या प्रदर्शनाचे उद््घाटन मंगळवारी होणार आहे. नव्या गुंतवणुकीसाठी नाशिक सज्ज असल्याची वर्दी त्यानिमित्ताने दिली जाणार आहे.मुंबई आणि पुण्याजवळील सुवर्ण त्रिकोणातील महत्त्वाचे शहर असलेल्या नाशिकमध्ये औद्योगिककरण झाले असले तरी बदलत्या काळात जिल्ह्याच्या विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याचा एक भाग म्हणून वरळी येथील नेहरू सेंटर आॅडिटरीयममध्ये होत असलेल्या या प्रदर्शनाची तयारी पूर्ण झाली आहे. मंगळवारी सकाळी १० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या उपक्र माचे उद््घाटन करण्यात येणार आहे. नाशिकचे उद्योग, व्यवसाय आणि अन्य पोषक स्थिती सांगणारे सुमारे साठ स्टॉल्सची उभारणी या प्रदर्शनात करण्यात आली आहे.
मुंबईत गाजणार नाशिकचे ब्रॅँडिंग
By admin | Published: May 30, 2017 12:52 AM