पंचवटी : श्रीराम व गरूड रथोत्सव यात्रा आटोपून चार महिन्यांचा कालावधी लोटला असला तरी गरूड रथ अद्यापही काळाराम मंदिर पूर्व दरवाजाबाहेरच उभा आहे. विश्वस्तांकडू दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे काळाराम संस्थान विश्वस्त मंडळाचे या रथाकडे दुर्लक्ष झाल्याची तक्रार स्थानिक भाविकांनी केली आहे.गरुड रथ उभा करण्यासाठी संस्थानची जागा असली तरी विश्वस्त मंडळाने अद्यापही गरूड रथ नियोजित जागेवर उभा केलेला नाही. त्यामुळे सध्या गरूड रथ हा काळाराम मंदिर पूर्व दरवाजाबाहेरच उभा आहे. ऊन, पावसात अनेक महिन्यांपासून रथ एकाच ठिकाणी असल्यामुळे रथ नादुरूस्त होण्याची भिती भाविक व्यक्त करीत आहेत. मंदिराबाहेर उभ्या असलेल्या या रथाला काळे प्लास्टिकचे कापड गुंडाळून ठेवण्यात आलेले आहे. काळाराम मंदिरात भाविकांची दैनंदिन गर्दी होत असल्याने सदरचा रथ नियोजित जागेवर उभा करावा अशी मागणी स्थानिक भाविकांनी केली.श्रीराम नवमीनिमित्त कामदा एकादशीला श्रीराम व गरु ड रथोत्सवाची यात्रा पार पडते. या दिवशी राम व गरूड रथाची पारंपरिक मार्गाने मिरवणूक काढली जाते. रथोत्सव यात्रा आटोपल्यानंतर रात्री उशिरा श्रीराम रथ मालवीय चौकातील नियोजित जागेवर उभा केला जातो तर गरूड रथ हा पूर्व दरवाजा शेजारी असलेल्या उजव्या जागेवर उभा केला जातो. मात्र चार महिने लोटल्यानंतरही गरूड रथ काळाराम मंदिर पूर्व दरवाजाबाहेरच उभा असल्याने तो नियोजित जागेवर उभा केलेला नाही याचे कारण गुलदस्त्यातच आहे. श्री काळाराम संस्थान विश्वस्त मंडळाने तत्काळ दखल घेऊन मंदिराच्या पूर्व दरवाजा जवळ उभा केलेला रथ नियोजित जागेवर उभा करावा अशी मागणी होत आहे.
श्री काळाराम मंदिराचा गरूड रथ रस्त्यावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 4:17 PM
पंचवटी : श्रीराम व गरूड रथोत्सव यात्रा आटोपून चार महिन्यांचा कालावधी लोटला असला तरी गरूड रथ अद्यापही काळाराम मंदिर पूर्व दरवाजाबाहेरच उभा आहे. विश्वस्तांकडू दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे काळाराम संस्थान विश्वस्त मंडळाचे या रथाकडे दुर्लक्ष झाल्याची तक्रार स्थानिक भाविकांनी केली आहे.
ठळक मुद्देविश्वस्तांचे दुर्लक्ष : चार महिन्यांपासून रथ असुरक्षित रथ नादुरूस्त होण्याची भिती